राष्ट्रीय स्तरावरील 'या' हॉकीपटूची हत्या!

राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू रिजवान खान (२०) याची  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 6, 2017, 11:45 AM IST
राष्ट्रीय स्तरावरील 'या' हॉकीपटूची हत्या! title=

 नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू रिजवान खान (२०) याची  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हत्या की आत्महत्या?

सोमवारी सकाळी रिजवान कोणालातरी २ लाख रुपये देण्यासाठी स्विफ्ट कारने निघाला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह सरोजनी नगरमधील सरकारी क्वार्टरजवळ सापडले. सुरूवातीला पोलीसांना त्याने आत्महत्या केल्याच्या संशय होता. तर रिजवानच्या कुटुंबियांनी त्याच्या मैत्रीणच्या कुटुंबुीयांवर आरोप केला आहे. पोलीसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 

कोण होता रिजवान?

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजवान त्याच्या कुटुंबियांसोबत डब्ल्यूजेड-564ए, तिहाड़ गावात रहात होता. त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, दोन बहीणी, एक भाऊ आणि दोन काका आहेत.
रिजवान बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याचबरोबर तो राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू होता.

त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.