Hardik Pandya Mystery Girl Viral Video: टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना असो, मुंबईत पार पडलेला अनंत अंबानी-राधिका मर्चंड यांचा विवाह सोहळा असो किंवा वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचं सेलिब्रेशन असो भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागील काही आठवड्यांपासून चर्चेत आहे. हार्दिक त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. पत्नी नताशा आणि हार्दिक यांच्यातील कथित वाद आता थेट चव्हाट्यावर आलेला आहे. असं असतानाच हार्दिकचे एका तरुणीबरोबरचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आला. हार्दिकचे हे मिस्ट्री गर्लबरोबरचे फोटो चर्चेत असतानाच आता या तरुणीने केलेली अन्य एक पोस्ट चर्चेत आहे.
खरं तर हार्दिकबरोबर व्हायरल फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या मुलीचं नाव प्राची सोलंकी आहे. प्राचीचे हार्दिकबरोबरचे फोटो व्हायरल झाल्याचा फायदा तिला फॉलोअर्स वाढवण्यासाठी नक्कीच झाला. तिच्या फॉलोअर्सची संख्या हजारोंनी वाढली असून आता तिची नवी पोस्टही सर्वाचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्राचीने पोस्ट केलेल्या व्हिडीओला दिलेली एक सूचक कॅप्शन सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
'गजनी' चित्रपटातील गुजारिश गाण्याचं म्युझिक प्राचीच्या या व्हिडीओत वापरण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये प्राची एका शिडीवर चढून मागे हसत वळून बघताना दिसते. मात्र या व्हिडीओच्या वर तिने, "कुछ तो बात है मुझमे, बिना कुछ किये कांड मे फस जाती हू.." अशी कॅप्शन दिली आहे. म्हणजेच प्राचीला, "माझ्यात नक्कीच काहीतरी खास आहे उगाच नाही काहीच न करता मी वादात अडकते" असं म्हणायचं आहे. काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
प्राचीच्या या व्हिडीओ खाली अनेकांनी तिला हार्दिकबरोबर लग्न कर असा सल्ला दिला आहे. "कर हार्दिकबरोबर लग्न, काय कमी आहे त्याच्याकडे? प्रेम करेल तुझ्यावर! तो फार भावनिक असल्याने तुझी काळजीही घेईल," असा सल्ला सतीश तिवारी नावाच्या चाहत्याने दिला आहे. इतरांनाही अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
दरम्यान, प्राचीबरोबरच्या फोटोंवर हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही, हे विशेष! दुसरीकडे हार्दिबरोबर घटस्फोटाची चर्चा असतानाच त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक आपल्या मुलाला घेऊन मायदेशी गेली आहे. मुंबई विमानतळावर नताशा अगस्तबरोबर दिसून आली. तिने प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.