व्हिडिओ : पंजाबविरुद्ध अशी जिंकली मुंबईची टीम

 मॅचच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार हे सांगण कठीण झाल होतं. पण...

Updated: May 17, 2018, 04:57 PM IST
व्हिडिओ : पंजाबविरुद्ध अशी जिंकली मुंबईची टीम  title=

नवी दिल्ली :  मुंबई आणि पंजाबमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईचा विजय झाला. ६० बॉलमध्ये ९४ रन्सची तुफानी खेळी करुनही के.एल.राहुल आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. जसप्रीस बुमराहच्या शानदार ४ ओव्हरसमोर पंजाबच्या टीमला रोखून धरल.मुंबईच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत १८६ रन्सच आव्हान समोर ठरल. याच उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेली पंजाबची टीम १८३ रन्सच बनवू शकली. मॅचच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार हे सांगण कठीण झाल होतं. पण शेवटच्या ओव्हरपर्यंत पंजाबचा हातचा विजय कसा निसटला हा जाणून घेऊया..  पंजाबचे अक्षर पटेल आणि युवराज सिंह मैदानावर होते. दोघेही अनुभवी खेळाडू पिचवर होते.

पहिला बॉल

मॅक्लनेघनने पहिला बॉल आऊट साइट ऑफला टाकला. पण विकेट किपर इशान किशन ठिक पकडू शकला नाही. त्यामुळे एक रन मिळाला.

दूसरा बॉल 

आता स्ट्राइकवर युवराज आला. पंजाबला जिंकण्यासाठी ५ बॉलमध्ये १६ रन्सची गरज होती. पण मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात युवराजने बॉल मिस केला. यावर एकही रन निघाला नाही. 

तिसरा बॉल 

मॅक्लनेघनने पुन्हा एकदा युवराजला लेंथ बॉल टाकला. पण स्कोरच्या दबावामुळे युवराज मोठा शॉट खेळाला आणि सीमा रेषेवर उभ्या असलेल्या फिल्डरकडे कॅच दिली. युवराजने ३ बॉलमध्ये १ रन्स बनविले. 

चौथा बॉल 

पंजाबच्या टीमला आता ३ बॉलमध्ये १५ रन्सची गरज होती.अक्षर पटेल स्ट्राइकवर होता. मॅक्लनेघननेच्या फुल टॉस बॉलवर सिक्स लगावला. 

पाचवा बॉल

आता पंजाबला २ बॉलमध्ये ९ रन्स पाहिजे होते. पण मॅक्लेघनने अक्षर पटेलने  चांगला बाऊंसर टाकला. त्यात धावून एक रन मिळाला. 

सहावा बॉल 

आता कोणता वाईट अथवा नो बॉल पंजाबला वाचवू शकत नव्हता. पण मॅक्लघनने शेवटचा चांगल्या बॉलला फोर गेला. पण मॅच पंजाबच्या हातून आधीच गेली होती. 
 
अशा रितीने ३ रन्सने मुंबईच्या टीमने पंजाबवर मात केली.