WPL 2024 : मुंबईच्या पोरींचा नाद खुळा, गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करत नोंदवला दुसरा विजय

WPL 2024, GGW vs MIW : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना मुंबई इंडियन्सन आणि गुजरात जायंट्सला यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात मुंबईच्या पोरींनी गुजरात जायंट्सला धूळ चारली.

सौरभ तळेकर | Updated: Feb 25, 2024, 10:56 PM IST
WPL 2024 : मुंबईच्या पोरींचा नाद खुळा, गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करत नोंदवला दुसरा विजय title=
WPL 2024, GGW vs MIW

Gujarat Giants vs Mumbai Indians : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024) तिसरा सामना मुंबई इंडियन्सन आणि गुजरात जायंट्सला (GGW vs MIW) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात मुंबईच्या पोरींनी गुजरात जायंट्सला 5 विकेट्सने धूळ चारली आहे. मुंबईची स्टार लेग स्पिनर एमेलिया केर (Amelia Kerr) हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर शबनिम इस्माईलने (Shabnim Ismail) 3 विकेट्स घेत गुजरातला बॅकफूटवर पाठवलं होतं. त्यामुळे गुजरातला फक्त 126 धावा करता आल्या. गुजरातने दिलेल्या 127 धावांचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला अन् लीगमधील दुसरा विजय नोंदवला आहे. 

गुजरातने दिलेल्या 127 धावांचं माफक आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांना मोठी खेळी करता आली नाही. दोघी प्रत्येकी 7 धावा करून बाद झाल्या. त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी सुट्टी दिली नाही अन् स्कोरबोर्ड पळवला. एका चुकीमुळे नॅटला विकेट गमवावी लागली. त्यानंतर गोलंदाजीत धुमाकूळ गाजवणाऱ्या अमेलिया केरने फलंदाजीतील टॅलेंट दाखवलं अन् 31 धावांची मॅच विनिंग खेळी केली. अमेलिया केरने मुंबईला विजयाच्या उंभरठ्यावर आणून ठेवलं. ती बाद झाल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीतने विजयी षटकार खेचत मुंबईच्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. 

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय हरमनप्रीतने घेतला होता. त्याचा परिणाम लगेच दिसून आला. वेदा कृष्णमूर्ती आणि हरलीन देओल झटपट बाद झाले. मात्र, कॅप्टन बेथ मुनी हिने एक बाजू राखून ठेवलीहोती. पुढे शबनीम इस्माईलच्या गोलंदाजीचा तिखट मारा सुरू राहिला अन् 58 वर 5 विकेट्स अशी परिस्थिती मुंबईची झाली. त्यानंतर अमेलिया केर हिने सुत्र हातात घेतली अन् गुजरातच्या टेल एन्टर्सला मैदान मोकळं करण्यास भाग पाडलं. अशा प्रकारे गुजरातला 20 ओव्हरमध्ये केवळ 126 धावा करता आल्या. ज्याचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला.

गुजरात जायंट्सचा संघ: बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, ली ताहुहू, मेघना सिंग.

मुंबई इंडियन्सचा संघ : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.