शोधू कुठं...शोधू कुठं...अन् अचानक स्टेडियमध्ये सुरु झाली शोधाशोध...csk काही सापडेना!

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी सामना रंगला होता.

Updated: May 14, 2022, 02:12 PM IST
शोधू कुठं...शोधू कुठं...अन् अचानक स्टेडियमध्ये सुरु झाली शोधाशोध...csk काही सापडेना! title=

मुंबई : प्लेऑफ मधून बाहेर गेलेल्या दोन्ही टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी सामना रंगला होता. यामध्ये मुंबईने पराभवाचा वचपा काढत चेन्नईवर विजय मिळवला. 5 विकेट्सने विजय नोंदवत यंदाच्या सिझनमधील तिसरा विजय मिळवला. दरम्यान आयपीएलमधील या मोठ्या सामन्यानंतर चेन्नईच्या टीमला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.

तर फक्त सोशल मीडियाच नव्हे, तर मुंबईच्या चाहत्यांनी भर मैदानात चेन्नईच्या चाहत्यांनी ट्रोल केलंय. याचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीयो चेन्नई आणि मुंबई यांचा सामना सुरु असतानाचा आहे. चेन्नई पराभवाच्या छायेत असताना मुंबईच्या एका चाहत्याने, भर स्डेडियममध्ये, शोधू कुठं...शोधू कुठं असं गाणं गाण्यास सुरुवात केली. यानंतर पिवळ्या जर्सीत चेन्नईचे चाहते दिसताच, दिसला गं बाई दिसला, असे गाण्याचे बोल सुरु झाले. यावरून मुंबईचे इतर चाहते या ट्रोलिंगचा आनंद घेताना दिसले. 

मुंबईविरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज पराभवाच्या जवळ असताना टीमचे चाहते शांत बसले होते. तर दुसरीकडे मुंबईचे चाहते मात्र हा क्षणाचा पुर्णपणे आनंद घेताना दिसले. 

गुरुवारच्या सामन्यात मुंबईने चेन्नईला अवघ्या 97 रन्समध्ये ऑलआऊट केलं. यानंतर विजयासाठी दिलेल्या 98 रन्सचं आव्हान मुंबईने 31 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 103 रन्स केले. तर मुंबईचा हा या हंगामातला तिसरा विजय ठरला. सोबतच  चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं.