विमानाचं तिकीट Book, सर्व तयारी Done, 'त्या' फोननंतर CSK चा बॉलर कोलमडला

आयपीएलच्या  (IPL 2022) 15 व्या हंगामात साखळी फेरीतूनचं चेन्नई (CSK)बाहरे पडलीय. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. कारण या आधी इतर हंगामात असे कधीच झाले नव्हते. नेहमीच चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि अंतिम लढतीपर्यत झुंज द्यायचा. 

Updated: May 14, 2022, 12:58 PM IST
विमानाचं तिकीट Book, सर्व तयारी Done, 'त्या' फोननंतर CSK चा बॉलर कोलमडला  title=

मुंबई : आयपीएलच्या  (IPL 2022) 15 व्या हंगामात साखळी फेरीतूनचं चेन्नई (CSK)बाहरे पडलीय. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. कारण या आधी इतर हंगामात असे कधीच झाले नव्हते. नेहमीच चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि अंतिम लढतीपर्यत झुंज द्यायचा. 
मात्र या हंगामात साखळी फेरीतच चेन्नईचा डाव फसलाय.  या धक्क्यातून सावरत नाही तोच चेन्नईच्या चाहत्यांना आता आणखीन मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या एका खेळाडूसोबत असं काही घडलं आहे जे एकूण चाहते संतापतील. 

चेन्नईच्या (CSK) संघात सिमरजीत सिंह हा तरूण गोलंदाज होता. सिमरजीत सिंह (Simarjeet Singh) अंडर 19 संघात खेळत होता. आता स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतोय.
या खेळाडूसोबत एक असा किस्सा घडलाय, जो किस्सा इतर कोणासोबत घडू नये असे चाहत्यांना नक्कीच वाटते. 

नेमका 'तो' किस्सा काय ? 

सिमरजीत सिंहला सामना खेळण्यासाठी सकाळी विमानाने निघाला. विमान पकडण्यासाठी त्याने सगळी तयारी केली. खूशीत असलेला सिमरजीत याला विमान सुटण्याच्या काही तास आधी एक कॉल आला. तो ज्या सामन्यासाठी खेळायला जाणार होता, त्या संघात त्याची निवड झाली नाही असा तो कॉल होता हा किस्सा स्वत: सिमरजीत याने सांगितला.

तो म्हणाला की, मला अंडर 19 आशिया चषकासाठी भारतीय संघात निवडले होते.मला ज्यादिवशी फ्लाइटने रवाना व्हायचे होते.त्याआधी काही तास मला फोन आला, तुम्ही याआधीही आशिया चषकात खेळलात.त्यामुळे तुम्हाला आता खेळता येणार नाही.सकाळी सात वाजता माझी फ्लाइट होती.पण रात्री मला 11 वाजता फोन आला आणि तू संघाचा भाग नसल्याचे सांगितले.

आई-वडिलांना दिला धीर 

 या घटनेनंतर मला खूप वाईट वाटले.पण त्यावेळी माझ्या आई वडिलांनी मला हिंमत दिली.  त्यामुळेच मी स्वत:ला सावरु शकलो. आई वडिल मला म्हणाले की, तू आता जिथे आहेस, त्याचा गर्व करायला हवा. त्यानंतर माझा आत्मविश्वास परतला. 

चेन्नईकडून पदार्पणाची संधी  

सिमरजीतने (Simarjeet Singh) चेन्नई सुपर किंग्ससाठी सनराइजर्स हैदराबाद विरोधात आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने चार षटकात 27 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. चेन्नईने सिमरजीतला 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलेय. याआधी 2021 मध्ये सिमरजीत मुंबई इंडियन्स संघाचा सहभाग होता.