MI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय!

MI vs LSG IPL 2023 Highlights: मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs MI) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या.

Updated: May 25, 2023, 10:58 AM IST
MI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय! title=
LSG vs MI

LSG vs MI Highlights IPL 2023: चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 81 धावांनी (LSG vs MI) पराभव केला आहे. आकाश मधवालच्या आक्रमण बॉलिंगमुळे मुंबईने आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवला आहे. मुंबईची आगामी भिडत ही गुजरात टायटन्ससह (GT vs MI) होणार आहे.

आकाश मधवालची कमाल

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या. त्यामुळे लखनऊच्या फलंदाजांना मैदानात टिकता आलं नाही आणि मुंबईने सहज विजय नोंदवून क्वालियफार टू मध्ये प्रवेश मिळणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. मुंबईकडून कोणत्याही फलंदाजांनी मोठी खेळी करता आली नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक 41 धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादव याने 33 धावांचं योगदान दिलं. लखनऊकडून नवीन उल हक याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नवीनने एकाच ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन या दोघांना आऊट करत मुंबईला बॅकफुटवर ढकललं होतं.

आणखी वाचा - अखेर पोटातलं ओठावर! 'आम्ही सुपरस्टार घडवतो, तू सुद्धा...', रोहित शर्माचे पांड्याला खडे बोल

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना  लखनऊ सुपर जायंट्सचे फलंदाज मैदानात टिकू शकले नाहीत.  कायले मेयर्स, प्रेरक मंकड, कृणाल पांड्या आणि  मार्कस स्टोयनिस या चार खेळाडूंपैकी कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. दीपक हुड्डा आणि मार्कस स्टोयनिस यांच्यावरम मोठी जबाबदारी होती. मात्र, या दोघांनाही संयम दाखवता आला नाही आणि मुंबईकडून लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. आता मुंबई आणि गुजरातचे संघ क्वालिफायर 2 मध्ये भिडणार आहेत.