विरूष्काच्या मुंबई रिसेप्शन सोहळ्यात 'झीवा आणि धोनी' ची खास एन्ट्री

लोअर परेल येथील हाई राईज' या पंचतारांकित हॉटेलमध्ये  विरूष्काच्या लग्नाचे रिसेप्शन  सुरू झाले आहे.

Updated: Dec 26, 2017, 10:46 PM IST
विरूष्काच्या मुंबई रिसेप्शन सोहळ्यात 'झीवा आणि धोनी' ची खास एन्ट्री   title=

मुंबई : लोअर परेल येथील हाई राईज' या पंचतारांकित हॉटेलमध्ये  विरूष्काच्या लग्नाचे रिसेप्शन  सुरू झाले आहे.

इटलीत मोजक्या लोकांमध्ये आणि गुप्तपणे लग्नबंधनात अडकल्यानंतर भारतात 'विरूष्का'च्या लग्नाचे दोन रिसेप्शन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.  

सेलिब्रिटींची उपस्थिती  

विरूष्काच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्याला सुमारे ६०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईतील रिसेप्शनला अभिनेता बोमन इराणी, संदीप पाटील सपत्निक पोहचले आहेत. सोबतच क्रिकेटर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे पोहचले आहेत. 
भारतीय संघाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीदेखील विरूष्काच्या रिसेप्शन सोहळ्याला सहपरिवार पोहचला आहे. यावेळेस महेंद्रसिंगची मुलगी झिवा हीच्या निरागस चेहर्‍याकडे सार्‍यांचे लक्ष खिळले होते. झिवानेदेखील  मीडियाला खास धोनीसह अभिवादन केले.   

 

 

 

विरूष्काचा खास पेहराव

विराट कोहली मुंबईतील रिसेप्शन पार्टीमध्ये निळ्या रंगाच्या वेलव्हेट ब्लेझर आणि पायजमामध्ये दिसला तर गोल्डन रंगाच्या आऊटफीटमध्ये अनुष्का शर्मा अगदीच  सुरेख दिसत आहे.