हे काय करतेय धोनीची पत्नी साक्षी? सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

'.. का नाही?', MS Dhoni च्या पत्नीच्या त्या व्हिडीओमध्ये असं काय खास आहे, ज्यामुळे होतोय व्हायरल   

Updated: Jul 24, 2022, 02:00 PM IST
हे काय करतेय धोनीची पत्नी साक्षी? सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सोशल मीडियापासून कायम दूर असतो, पण त्याची पत्नी साक्षी चाहत्यांना पतीबद्दल अपडेट देत असते. एवढंच नाही तर, साक्षी स्वतःचे आणि लेकीचे देखील फोटो पोस्ट करत असते. आता साक्षीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. नेहमी आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी साक्षी यावेळी मेकअप करताना हटके पद्धतीचा वापर करताना दिसत आहे. सध्या साक्षीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नुकताचं साक्षीने इंस्टाग्रामवर एक मजेदार चॅलेंज स्वीकारले. तिने व्हायरल फ्रूट मेकअप चॅलेंज स्वीकारत ते पूर्ण देखील केलं. हाच चॅलेंज पूर्ण करताना साक्षीचा व्हिडीओ तुफान चर्चेथ आहे. ज्यामध्ये साक्षी मेकअप करण्यासाठी  लाल चेरी वापर करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये साक्षी सुरुवातीला थोडी चेरी खाते, त्यानंतर ती चेरी ओठांना आणि गालाला लावताना दिसत आहे. अखेर चॅलेंज पूर्ण केल्यानंतर साक्षी चेरी खाते. हा व्हिडीओ पोस्ट करत साक्षीने कमेंटमध्ये '.. का नाही?' असं कॅप्शन दिलं आहे. 

साक्षीची क्रिएटिव्हिटी पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ती चेरीचा वापर कलर ब्लश करताना दिसत आहे, तर लिप्सस्टिक म्हणून देखील चेरीच वापरत आहे.