नवी दिल्ली : भारतीय टीमचा दिग्गज खेळाडू महेंद्र सिंह धोनी यांच्या 2 फ्लॅटचा लिलाव होणार आहे. 1100 आणि 900 चौरसफूटचे हे 2 फ्लॅट आहे. डोरंडामध्ये हे धोनीचे 2 फ्लॅट आहेत. बिल्डर दुर्गा डेव्हलपर्स प्रायवेट लिमिटेडने लोन न भरल्याने धोनीला हा फटका बसला आहे. हुडकोने शिवम प्लाजाच्या लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. इलाहाबादमधील कर्ज वसूल करणाऱ्या प्राधिकरणाने लिलावासाठी योग्य ती रक्कम ठरवण्याने आदेश दिले आहेत.
6 कोटीसाठी योग्य व्याज आणि परतफेडच्या हिशोबाने रक्कम ठरवली जाईल. लिलावासाठी मिळालेली रक्कम हुडको आपल्या खात्यात जमा करेल. विकले गेलेल्या फ्लॅटचा देखील लिलाव होणार आहे. दुर्गा डेवलपर्सने शिवम प्लाजा बनवण्यासाठी 12 कोटी 95 लाख रुपयांचं लोन घेतलं होतं. 10 माळ्याची ही ईमारत होती. यातच जमिनीचे मालक आणि दुर्गा डेव्हलपर्स यांच्यामध्ये वाद झाला. यामुळे 6 कोटी दिल्यानंतर ही हुडकोने दुर्गा डेव्हलपर्सला लोनची बाकी रक्कम देणे थांबवलं.
6 माळ्याची बिल्डींग बांधून झाल्यानंतर काम थांबलं. लोन भरण्यासाठी उशीर झाल्याने हुडकोने कंपनीला डिफॉल्टर घोषित केलं. या ईमारतीमध्ये धोनीचे 2 फ्लॅट आहेत. या दोन्ही फ्लॅटससाठी धोनीने दीड कोटी दिले आहेत. यानंतर आता मात्र हे दोन्ही फ्लॅट धोनीच्या हातातून निघून जाणार आहेत.