महेंद्रसिंह धोनीने पत्नी साक्षीला Wedding Anniversary Gift म्हणून कोणती कार दिली? अंदाज लावा कोणती असेल?

बाईकवेड्या धोनीकडून लग्नाच्या 11 Wedding Anniversary निमित्त साक्षीला दिलं भन्नाट गिफ्ट, हे गिफ्ट पाहून तुम्हालाही आनंद होईल

Updated: Jul 4, 2021, 08:53 PM IST
महेंद्रसिंह धोनीने पत्नी साक्षीला Wedding Anniversary Gift म्हणून कोणती कार दिली? अंदाज लावा कोणती असेल? title=

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल धोनी आणि साक्षीच्या लग्नाचा आज 11 वा वाढदिवस आहे. धोनीनं या निमित्तानं पत्नी साक्षीला खास गिफ्ट दिलं आहे. सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल म्हणून साक्षी आणि धोनीकडे पाहिलं जातं. आज या दोघांच्याही आयुष्यातला खास दिवस आहे.

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी आपल्या 11 व्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. बाईकवेड्या धोनीनं साक्षीला एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. धोनीच्या घरी आधीच कुत्रे आणि त्यांच्यासोबत दोन घोडे देखील आहेत. पण त्याशिवाय काहीतरी वेगळं गिफ्ट यावेळी साक्षीला मिळालं आहे. 

2010मध्ये अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये धोनी आणि साक्षीने विवाह केला होता. या लग्नासाठी केवळ खास मित्रांनाच निमंत्रण होतं. धोनीने यंदा लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं खास कार गिफ्ट केली आहे. 

आकाशी रंगाची विंटेज कार माहीने साक्षीला गिफ्ट दिली आहे. याचा फोटो साक्षीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये Anniversary Gift दिल्याबद्दल धन्यवाद असं कॅप्शन देऊन साक्षीनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या ट्विटरवर खास अंदाजात या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. राजा आणि राणीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा असं कॅप्शनमध्ये लिहून फोटो ट्विट केला आहे. या दोघांनाही सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.