मुंबई : माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबऱ्यावर आहे. धोनी आता सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या विकेटकिपरच्या एक पाऊल मागे राहिलेला आहे.
श्रीलंके विरोधात दुसऱ्या वनडे मध्ये धनुष्का गुनाथिलकाला स्टंप आऊट केलं आहे. आणि आता धोनी विकेटकीपर कुमारा संगाकाराच्या बरोबर पोहोचला आहे. संगाकारा आणि धोनीने विकेटच्या पाठीमागे ९९ वेळा बॅट्समनला स्टंप आऊट केलं आहे. अजून एकदा स्टंप आऊट करताना धोनी वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा विकेटकिपर बनणार आहे. यासोबतच १०० वेळा स्टपिंग करणारा हा पहिला क्रिकेटर असणार आहे. पहिल्या वन डे मध्ये लसिथ मलिंगाला आऊट करून धोनीने आतापर्यंत ९८ शिकार केले आहेत. आता सगळ्यांचं लक्ष धोनीच्या १०० व्या विकेटकडे असणार आहे.
एवढंच नाही तर श्रीलंकाला ३-० च्या आधारावर भारतीय संघाने एक नवा इतिहास रचला आहे. हे पहिल्यांदाच झालं आहे की भारताने कोणत्या विदेशी जमिनीवर ३-० ने सिरीज जिंकली आहे. भारतीय क्रिकेटच्या ८५ वर्षाच्या इतिहासात भारताने २००४ मध्ये बांग्लादेश आणि २००५ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सिरीजमध्ये क्लिन स्विप केली आहे. भारतीय संघाने वन डे सिरीजमध्ये आता आत्मविश्वास डबल झाला आहे. पहिला सामना त्यांनी ९ विकेटने जिंकला होता. शिखर धवनने १३२ आणि कॅप्टन विराट कोहलीने ८२ धावांची पारी केली आहे. या दौऱ्यात भारताला आता ३ वनडे आणि ए टी २० मॅच खेळायची आहे.
रिपोर्टनुसार, महेंद्र सिंह धोनीने निवृत्तीची तयारी केली आहे. क्रिकेटनंतर धोनी एका नव्या बिझनेसमध्ये काम सुरू देखील केलं आहे. असं सांगितलं जातं की धोनी आपल्या रांचीमध्ये एक फाइव स्टार हॉटेल सुरू करत आहे.