मुंबई : इंग्लंडमध्ये वनडे आणि टी २० संपवल्यानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू एमएस धोनी सध्या आपल्या घरी सुट्टी एन्जॉय करतोय. धोनीने इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केलायं. ज्यामध्ये तो एका छोट्याशा सायकलवर बसून स्टंट करतोयं. धोनीने मजेमजेत हा स्टंट केलायं. 'जस्ट फॉर फन, प्लीज इसे घरपे ट्राय किजीए' असं त्याने या व्हिडिओला कॅप्शनही दिलंय. धोनीने हा व्हिडिओला स्लो मोशनमध्ये बनवलंय. हा खतरनाक स्टंट असेल असं सुरूवातीला वाटतं. जसजसा व्हिडिओ पुढे जातो तेव्हा यातील मज्जा अधिकाधिक कळत जाते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल माही किती मज्जा घेतोयं ते. तो पाय उचलून सायकल घेऊन जातोय आणि जेव्हा थांबतोय तेव्हा हेडफोन कानातून हटतोयं.
भारत आणि इंग्लंडदरम्यान १ ऑगस्टपासून टेस्ट सिरीज सुरू होतेयं. धोनीने २०१४ मध्येच टेस्ट क्रिकेटमधून सन्यास घेतल्याने तो वन डे आणि टी २० खेळून भारतात परतला.