IPL 2023: ...तर मी आज जिवंत नसतो; Mohammed Siraj ने सांगितला धक्कादायक किस्सा!

IPL 2023, RCB: मी माझ्या स्थितीबद्दल कोचला कळवलं होतं, त्यावेळी त्यांना विश्वास बसला नाही. मी खोटं बोलत असावा, असं प्रशिक्षकाला वाटलं होतं, असं मोहम्मद सिराज (Moahmmed Siraj) सांगतो.

Updated: May 14, 2023, 04:21 PM IST
IPL 2023: ...तर मी आज जिवंत नसतो; Mohammed Siraj ने सांगितला धक्कादायक किस्सा! title=
Mohammed Siraj, IPL 2023, RCB

Mohammed Siraj, IPL 2023: आयपीएल 2023 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) संघ अधिक प्रभावीपणे खेळताना दिसत आहे. एकीकडे विराट (Virat Kohli) आणि डुप्लेसिसच्या ( Royal Challengers Bangalore) खांद्यावर जबाबदारी घेत आहेत. तर दुसरीकडे गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) बॉलमधून आग ओकताना दिसतोय. त्यामुळे बंगळुरू प्लेऑफच्या स्पर्धेत कायम असल्याचं दिसून येतंय. राजस्थान विरुद्धच्या (RR vs RCB) सामन्यात आरसीबी विजय नोंदवणार का? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच मोहम्मद शमीने धक्कादायक किस्सा सांगितला आहे.

काय म्हणाला मोहम्मद शमी?

अंडर 23 संघ दुसऱ्या दिवशी रवाना होणार होता, त्यामुळे मी तणावात होतो. घरी बसण्याऐवजी काही दिवस आधी मी इकडे तिकडे फिरत होतो. माझं सिलेक्शन झालं होतं, पण मला अॅडमिट करण्यात आलं होतं. मला डेंग्यू झाला होता, त्यामुळे माझ्या रक्तपेशींची (blood cell count) संख्या खूपच कमी झाली होती. त्यामुळे मला ऐन आदल्या रात्री ऍडमिट करण्यात आलं. मला ऍडमिट केलं नसतं तर मी आज जिवंत असलो नसतो, असं मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) म्हणाला आहे.

मी माझ्या स्थितीबद्दल कोचला कळवलं होतं, त्यावेळी त्यांना विश्वास बसला नाही. मी खोटं बोलत असावा, असं प्रशिक्षकाला वाटलं होतं. मी आधीही सरावासाठी कोचशी खोटं बोलून दांड्या मारल्या होत्या, असंही मोहम्मद सिराजने यावेळी सांगितलं. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये बोलताना मोहम्मद शमीने (Mohammed Siraj) हा किस्सा सांगितला आहे.

Mohammed Siraj: 'सॉरी मला माफ कर...', अखेर 'त्या' कृत्यावर सिराजने खुलेआम मागितली माफी; पाहा Video

दरम्यान, विराट आणि गंभीरच्या भांडणात 'कळीचा नारद' ठरला तो मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. आत्तापर्यंत मोहम्मद सिराजमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) तीन वेळा वाद पेटला होता. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) यांच्याशी सिराजचं वाजलं होतं. तर त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) सामन्यात सिराजने स्वत:च्या टीममधील महिपाल लोमरोर (Mahipal Lomror) याच्यावर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आरसीबीचा भांडखोर म्हणून सिराजला ट्रोल केल्याचं दिसून आलंय.