Hasin jahan instragram post On bangladesh : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता हसीन जहाँने बांगलादेशमधील हिंसाचारावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इन्टाग्रामवर पोस्ट करत मोहम्मद शमीच्या पत्नीने सिस्टिमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, हसीन जहाँची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली. हसीनची पोस्ट हिंदूविरोधी असल्याचं काहींनी म्हटलं आहे. त्यावर देखील हसीन जहाँने प्रत्युत्तर दिलंय.
मला बांगलादेशच्या लोकांचा अभिमान आहे. बांगलादेशी लोकांनी संपूर्ण जगाला एक मोठा धडा दिला आहे. जनतेच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती नाही. बांगलादेशी लोकांनी जगाला सांगितले आहे. आपल्या भारत देशाच्या वाघांनो, तुम्हीही ताकद दाखवा आणि गुन्हेगारांना देशातून हाकलून द्या, अशी पोस्ट हसीन जहाँने केली आहे. जाती-धर्माच्या नावाखाली गलिच्छ आणि मूर्खपणाचे राजकारण करून देशाच्या राज्यघटनेशी खेळले गेले आहे. लोकांवर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे, महिलांच्या इज्जतीशी खेळले गेले आहे, असं म्हणत हसीन जहाँने नाराजी देखील बोलून दाखवली.
वकील आणि न्यायाधीश विकले जात आहेत. देशाचा कायदा आणि संविधान हे केवळ खेळण्यासारखे बनले आहे. प्रत्येक गरीब माणूस न्यायासाठी न्यायालयात उभा आहे. उद्या तुम्हीही लाचार व्हाल, जर तुम्ही कोणतेही पाऊल उचलले नाही तर आमची सर्व मुले आणि तुम्हालाही जीवन जगण्यास भाग पाडले जाईल, अशी पोस्ट हसीन जहाँने केली होती. त्यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलंय.
मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट हिंदूविरोधी असल्याचं काहींनी म्हटलं. मोहम्मद शमीच्या पत्नीची हिंदू विरुद्ध नाराजी दिसून येते, असं एकाने पोस्ट करत म्हटलं होतं. त्यावर देखील हसीन जहाँने पोस्ट करत प्रत्युत्तर दिलंय. मी हिंदू लोकांचा द्वेष का करू? माझ्या आयुष्यात ९८ टक्के हिंदू लोक आहेत. मी नेहमीच हिंदू संस्कृतीत आलो आहे. मी हिंदू धर्म आणि संस्कृतीचा मनापासून आदर करतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. मी प्रत्येक हिंदू सण साजरे करतो आणि माझ्या मुलांचेही पालनपोषण करतो. त्यामुळे मुस्लिम नावाचे लोक मला शिवीगाळ करतात, असं हसीन जहाँने म्हटलंय.
दरम्यान, म्ही माझी पोस्ट काळजीपूर्वक वाचा, मी देशात होणाऱ्या अन्यायाविरोधात लिहिलं आहे. मला अडचणीत आणण्याचा, खेळ त्या गुन्हेगारांचा आहे. बरं, अल्लाह सर्व गोष्टी बघतोय, असं म्हणत हसीन जहाँने सणसणीत प्रत्युत्तर दिलंय.