Mohammed Shami Video : शमी मैदानात उतरताच प्रेक्षकांचा गदारोळ; लगावले जय श्रीरामचे नारे

IND vs AUS 4th Test: या सामन्यामध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) सोबत प्रेक्षकांनी लज्जास्पद कृत्य केलं. प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनला असलेल्या शमीला चिडवण्याचा प्रयत्न तेला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

Updated: Mar 10, 2023, 05:30 PM IST
Mohammed Shami Video : शमी मैदानात उतरताच प्रेक्षकांचा गदारोळ; लगावले जय श्रीरामचे नारे title=

Mohammed Shami Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात असून, अहमदाबादच्या स्टेडियममध्ये चौथा टेस्ट सामना सुरु आहे. या सामन्यात दोन्ही दिवशी ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. या पहिल्या दिवशी सामना सुरु होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले होते. दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) एक घटना घडली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

या सामन्यामध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) सोबत प्रेक्षकांनी लज्जास्पद कृत्य केलं. प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनला असलेल्या शमीला चिडवण्याचा प्रयत्न तेला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचे सर्व खेळाडू चाहापानानंतर मैदानावर पुन्हा परतत होते. यावेळी संपूर्ण टीम बाऊंड्री लाईनजवळ उभी होती. यावेळी सूर्यकुमार यादवला पाहताच स्टेडियममधील लोकं सूर्या सूर्या ओरडू लागले. यावेळी सूर्याने त्यांना हात जोडून अभिवादन केलं.

यावेळी सूर्याच्या बाजूला मोहम्मद शमी (Mohammed Shami) देखील उभा होता. सूर्याच्या नाऱ्यानंतर प्रेक्षकांनी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम असे देवाचे नारे लगावणं सुरु केलं. ही गोष्टी तेव्हा अती झाली जेव्हा, प्रेक्षक शमीचं नाव घेऊन जय श्री राम ओरडू लागले. 

प्रेक्षकांचं हे वागणं अयोग्य 

प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये घडलेलं हे दृश्य क्रीडाप्रेमी आणि मुस्लिम खेळाडूसाठी खूपच अस्वस्थ करणारं होतं. यावेळी प्रेक्षकांच्या या नाऱ्यांकडे दुर्लक्ष करत शमीने मैदानाकडे निघून गेला.

ऑस्ट्रेलिया टीम 480 रन्समध्ये ऑलआऊट 

चौथ्या सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन टीमचं वर्चस्व दिसून आलं. ऑस्ट्रेलियाच्या टीमने पहिल्या डावामध्ये 480 रन्स केले. कांगारूंच्या पहिल्या इंनिंगमध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी शतकी खेळी खेळली. ख्वाजा 180 तर ग्रीन 114 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. मुख्य म्हणजे या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 208 रन्सची पार्टनरशिप केली. 

टीम इंडियाकडून स्पिनर रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक म्हणझेच 6 विकेट पटकावल्या. तर मोहम्मद शमीला 2 विकेट्स घेण्यात यश आलं आहे.