भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) सध्या टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या (ind vs eng) मालिकेत तो दिसला होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याला संघाचा भाग बनवण्यात आले होते, पण कोरोनाची (Corona) लागण झाल्यामुळे तो खेळू शकला नाही. दरम्यान, त्याच्या एका ट्विटमुळे तो कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे.
मोहम्मद शमीने ट्विटरवर दसऱ्याच्या (dasara) शुभेच्छा दिल्यामुळे तो कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे. ट्विटरवर (twitter) काही युजर्सनी त्याच्या ट्विटला धर्माशी जोडत त्याच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर या ट्विटमुळे शमीला (Mohammad Shami) नाव बदलण्याचा सल्लाही देण्यात आलाय. मात्र, शमीने त्याकडे लक्ष दिले नाही. शमीच्या या ट्विटला आतापर्यंत 41 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. तसेच त्याला मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दिला आहे.
शमीने आपल्या ट्विटमध्ये प्रभू रामाचा (shree ram) फोटोही पोस्ट केला आहे. "दसर्याच्या या पवित्र सणानिमित्ताने, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश येवो हीच माझी भगवान रामाकडे प्रार्थना आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा," असे शमीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटवरून काही युजर्सनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. एका युजरने तर त्याच्या विरोधात फतवा काढला जाऊ शकतो असेही म्हटले आहे.
On the happy occasion of Dussehra, I pray that Lord Ram fills your life with lots of happiness, prosperity, and success. Happy Dussehra to you and your family. #mdshami11 #Dussehra pic.twitter.com/wsFk7M1Gj5
— Mohammad Shami (@MdShami11) October 5, 2022
शमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्टँडबायवर
दरम्यान, शमी जुलैमध्ये मँचेस्टरमध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. याआधी तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याचाही भाग होता. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकानंतर तो या फॉरमॅटमध्ये भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. शमीची टी-20 विश्वचषकामध्ये स्टँडबाय म्हणून निवड झाली आहे. शमीने आतापर्यंत 60 कसोटी, 82 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.