T20 world cup : 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 world cup 2022) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक संघ ऑस्ट्रेलियात (australia) दाखल होत आहे. रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ (Team India) गुरुवारी पहाटे टी-20 विश्वचषकासाठी (T20 world cup 2022) ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोशल मीडियावर याचा एक फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासह सर्व खेळाडू दिसत आहेत. सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाकडून खूप अपेक्षा आहेत. भारताने शेवटचा टी-20 विश्वचषक 2007 साली जिंकला होता. आता 15 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या (australia)मैदानात उतरणार आहे.
मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर सहकारी खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील एका गोष्टीमुळे वेगळीच चर्चा सुरुय. या फोटोत विराटसोबत युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही दिसत आहेत. विराटने कॅप्शनमध्ये, 'ऑस्ट्रेलियाला निघत आहे. येणारे दिवस खूप छान असतील, असे म्हटलं आहे. यासोबत चहल आणि हर्षललाही टॅग केलय.
विराट कोहलीच्या या फोटोमध्ये त्याचे घड्याळही दिसत आहे. याकडे अनेक चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. लोकांना त्याची किंमत किती आहे हे जाणून घेण्याची देखील उत्सुकता आहे. दरम्यान हे घड्याळ रोलेक्स कंपनीचे आहे. रोलेक्सच्या वेबसाइटनुसार विराटने घातलेल्या डेटन (Dayton) या मॉडेलची किंमत सुमारे 28 लाख रुपये आहे. हे मॉडेल आपल्या आवडीनुसार बनवता येते. विराटने जे घड्याळाचे मॉडेल घातले आहे ते गोल्डन प्लेटेड आहे. विराटला महागड्या गाड्यांसह घड्याळांची वेड आहे.
दरम्यान, भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. याआधी भारतीय संघ पर्थ येथील प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याबद्दल सांगितले होते की, "स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला लवकर रवाना होण्याचा उद्देश खेळाडूंना तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे हा आहे. ज्या क्रिकेटपटूंनी आतापर्यंत त्या देशात एकही सामना खेळलेला नाही, अशांसाठी हे महत्त्वाचे आहे."
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग. स्टँडबॉय: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.