नवी दिल्ली : मोईन अलीच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला ओल्ड ट्रॅफर्डमध्ये चौथ्या आणि अंतीम टेस्ट मॅचमध्ये १७७ धावांनी पराभूत केले. यामुळे इंग्लंडने सिरीजवर ३-१ ने कब्जा केला.
आफ्रिकेला आपल्या जमीनीवर नमवण्यासाठी इंग्लंडला १९ वर्ष वाट पाहावी लागली आहे. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला ऑलराउंडर मोईन अली... या ऑलराऊंडर कामगिरीमुळे त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये एक खास कामगिरी करणारा क्रिकेटर बनला आहे.
मोईन अलीने असा रेकॉर्ड बनविले आहे, जे २००५ पासून कोणत्याही इंग्लंड क्रिकेटरला करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजमध्ये मोईन अली याने फलंदाजी करताना २०० पेक्षा अधिक धावा केल्या तर २० विकेट पटकावल्या. २००५ नंतर इंग्लंडकडून करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
यापूर्वी अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्या नावावर हा विक्रम होता. त्याने २००५च्या अॅशेज सिरीजमध्ये २०० पेक्षा अधिक धावा केल्या आणि २० विकेट घेतल्या होत्या.
WICKET! @MoeenAli strikes again as Morkel is caught by @root66!
One more needed!
SA 202/9 #ENGvSAhttps://t.co/OXL4eze4Ex pic.twitter.com/iRffbHWFcP
— England Cricket (@englandcricket) August 7, 2017
४ सामन्यांच्या सिरिजमध्ये मोईनने ३६च्या सरासरीने २५२ धावा केल्या यात दोन अर्धशतक केले. त्याचा सर्वोच्च ८७ धावा केल्या. तर १७.५५ च्या सरासरीने २० विकेट पटकावल्या.
मोईन अलीने तीन टेस्टमध्ये ८७, ७, १८,२७, १६ आणि ८ धावा काढल्या. तर विकेटबाबत बोलायचे तर ४,६,०,४,०,४ आणि अखेरच्या टेस्टमध्ये २ विकेट घेतल्या.