मुंबई : महिला क्रिकेटच्या वनडे टीमची कर्णधार मिताली राजने क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला आहे. शुक्रवारी इंग्लंड विरुद्ध खेळताना मिचाली राजने आपल्या नावावर अजून एक रेकॉर्ड केला. ती आता महिला क्रिकेटची नंबर वन खेळाडू झाली आहे. १९५ वनडे मॅच खेळणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. ३५ वर्षीय मिताली राजने पहिली वनडे मॅच २६ जून १९९९ मध्ये खेळली.
मितालीने आतापर्यंत ६२९५ इतक्या धावा केल्या आहेत. यात ६ शतक आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय ती १० टेस्ट मॅच आणि ७२ टी २० मॅच खेळली आहे. यापूर्वी सर्वात अधिक वनडे मॅच खेळण्याचा रेकॉर्ड चारलोट एडवर्ड्सच्या नावे होता.
खेळाडू मॅचेस
मिताली राज- १९२
चार्लोट एडवर्ड्स- १९१
झूलन गोस्वामी- १६७
एलेक्स ब्लेकवेल- १४४
वनडेमध्ये सातत्याने ७ अर्धशतकं झळकवणारी मिताली जगातील एकमेव खेळाडू आहे. तर टी २० मध्ये सातत्याने ४ अर्धशतकं झळकवणारी जगातील पहिली महिला फलंदाज आहे. टी २० मध्ये तिने सातत्याने ६२, ७३, ५४ आणि ७६ धावा केल्या आहेत. यापैकी दोन मॅचेसमध्ये ती नॉटआऊट होती. ४९ अर्धशतकं करुन मितालीने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ५० अर्धशतकं करण्यापासून तिला फक्त एका अर्धशतकाची गरज आहे.