मुंबई : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बुधवारी 14 एप्रिलला पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला. पंजाब विरुद्ध मुंबईच्या झालेल्या या पराभवाला जवळपास सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कारणीभूत ठरवलं जात आहे. (mi vs pbks ipl 2022 mumbai indians tilak varma and kieron pollard run out turning point of match)
मुंबईची बॅटिंग असताना सूर्यकुमारच्या चुकीच्या कॉलमुळे निर्णायक क्षणी 2 फलंदाज रन आऊट झाले. कायरन पोलार्ड आणि तिलक वर्मा हे दोघेही रनआऊट झाले. तिलक 13 व्या ओव्हरमध्ये मुंबईच्या 131 धावा असताना सूर्यकुमारच्या चुकीच्या कॉलमुळे रन आऊट झाला.
त्याचं झालं असं की, सूर्यकुमार शॉट मारल्यानंतर धावण्याऐवजी बॉल पाहत राहिला. तर दुसऱ्या बाजूला तिलक वर्मा धावत सुटला. या दरम्यान पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालने तिलकला रन आऊट केलं. तिलक वर्मा 36 धावा करुन माघारी परतला.
यानंतर 17 व्या ओव्हरमध्ये पोलार्ड सूर्यकुमारसोबत धावा घेण्याच्या गडबडीत रन आऊट झाला. पोलार्डने 10 धावा केल्या. पोलार्डची विकेट ही गेमचेंजर ठरली. यानंतर सूर्यकुमार 43 धावांवर आऊट झाला. यामुळे अखेर मुंबईला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.