मेरी कॉमने रचला इतिहास, देशासाठी जिंकलं एशियन चॅम्पियन्समध्ये गोल्ड

पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारतीय बॉक्सर एम.सी.मेरीकॉमने एशियाई बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं आहे. मेरीकॉमने हा सुवर्ण पंच ४८ किली वयोगटात लगावला आहे.

Updated: Nov 8, 2017, 01:44 PM IST
मेरी कॉमने रचला इतिहास, देशासाठी जिंकलं एशियन चॅम्पियन्समध्ये गोल्ड title=

नवी दिल्ली : पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारतीय बॉक्सर एम.सी.मेरीकॉमने एशियाई बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं आहे. मेरीकॉमने हा सुवर्ण पंच ४८ किली वयोगटात लगावला आहे.

मेरीकॉम उत्तर कोरियाच्या बॉक्सरला ५-० ने मात दिली. यासोबतच एशियाई गोल्ड पुन्हा भारतात आणण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलंय.

मणिपूरची मेरीकॉम ही तीन मुलांची आई आहे. आणि तिने तब्बल १ वर्षांच्या गॅपनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये वापसी केली आहे. याआधी मेरीकॉमने मंगळवारी एशियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मेरी कॉमने जपानच्या तसुबासा कोमुराला ५-० ने मात देत फायनलमध्ये जागा मिळवली होती. आपल्या अनुभवाच्या जोरावर तिने या बॉक्सर्सना सहज मात दिली.