स्टुअर्ट बिन्नीला ट्रोल करणाऱ्या युजर्सला मयंती लँगरचं कडक शब्दात उत्तर

ट्रोल करणाऱ्यांना मयंती लँगरचं उत्तर

Updated: Feb 7, 2020, 03:40 PM IST
स्टुअर्ट बिन्नीला ट्रोल करणाऱ्या युजर्सला मयंती लँगरचं कडक शब्दात उत्तर title=

मुंबई : सोशल मीडियावर खेळाडू किंवा सेलिब्रिटींना वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल केलं जातं. जेव्हा कोणी काही चांगलं करतं तर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होतो. तर काही गोष्टी कधी पटल्या नाहीतर सोशल मीडियावर युजर्स त्यांना ट्रोल करतात. खेळाडूंच्या बाबतीत ही असंच होतं. जेव्हा तो फॉर्ममध्ये नसतो त्याला ट्रोल केलं जातं. असाच अनुभव क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) आणि त्याची पत्नी मयंती लँगर (Mayanti Langer)यांना देखील आला.

35 वर्षाचा स्टुअर्ट बिन्नीने भारतासाठी 6 टेस्ट, 14 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता. यानंतर त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही. त्याने नंतर रणजी कर्नाटक टीममधून ही जागा गमवली. सध्या तो नागालँडकडून खेळतो आहे.

स्टुअर्टची पत्नी मयंती लँगरने सोशल मीडियावकर एक फोटो पोस्ट केला आहे. सोबत तिने म्हटलंय की, आमच्या स्टूडियोमधील जीवन रंगीबेरंगी आहे. यावर एका युजरने बिन्नीबाबत कमेंट केली. ज्यामध्ये तिने त्याला चांगलंच उत्तर दिलं आहे.

virat

मयंतीच्या पोस्टवर एका यूजरने विचारलं की, सध्या स्टुअर्ट बिन्नी कुठे आहे.?’ यावर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, ‘तो सध्या तिची बॅग उचलण्यात मदत करतो आहे.’ स्टुअर्ट बिन्नी हा रोजर बिन्नी (Roger Binny) यांचा मुलगा आहे. ज्यांनी 1983 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेतले होते.

मयंती लँगरने या युजरलो जोरदार उत्तर दिलं. तिने म्हटलं की, 'धन्यवाद, पण मी स्वत:ची बॅग स्वत:च उचलते. तो सध्या त्याच्या जीवनाचा आनंद घेत आहे. क्रिकेट खेळत आहे आणि छान व्यक्ती आहे. आणि अशा लोकांवर कमेंट नाही करत आहे. ज्यांना काही माहित नाही.'

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x