खेळतानाच शारापोव्हाला केला प्रपोज, तिनेही दिले उत्तर

तो जोरजोराने म्हणाला, ' तु माझ्याशी लग्न करशील का मारिया? ' 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 30, 2017, 06:06 PM IST
 खेळतानाच शारापोव्हाला केला प्रपोज, तिनेही दिले उत्तर  title=

 टेनिसपटू मारिया शारापोव्हाला टेनिस कोर्टवर लग्नाचा प्रस्ताव मिळाला आहे. आणि या प्रस्तावाला प्रतिसाद देत शारापोव्हाने आश्चर्य व्यक्त केले. 

माझ्याशी लग्न करशील का ?

शारापोव्हा इस्तंबूल मध्ये होणाऱ्या स्पर्धेची तयारीसाठी एका टुर्नामेंटमध्ये खेळत होती. कोर्टवर ती सर्व्हिस करण्याच्या तयारीत असतानाच प्रेक्षकांमधून एका तरुणाचा आवाज आला.

तो जोरजोराने म्हणाला, ' तु माझ्याशी लग्न करशील का मारिया? '

मारियाने या प्रश्नाचे ज्या पद्धतीने उत्तर दिले ते ऐकून सर्वांनाच हासू आवरणे कठीण झाले होते. 

 'मे बी'

तो आवाज ऐकून मारिया हसली आणि मग डोकं हलवत मे बी 'कदाचित' असे उत्तर दिले.   यानंतर सर्व लोक जोराने हसूयला लागले.

डोपिंगमूळे बंदी 

शारापोवाने हा सामना ७-६, ६-० असा जिंकला. यावर्षी एप्रिल महिन्यात शारापोवा टेनिस कोर्टात परतली.

यापूर्वी तिच्यावर १५ महिन्यांची बंदी होती. डोपिंगमुळे तिच्या खेळावर बंदी आणण्यात आली होती.

तिला यावर्षी यूएस ओपनवर वाइल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला. त्यात तिने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली.