मुंबई: भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहर नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. दीपक चाहरने मैत्रिण जया भारद्वाज हिच्यासोबत १ जून रोजी आग्रा येथील हॉटेलमध्ये लग्न केलं. दीपक आणि जयाच्या लग्न सोहळ्याला नातेवाईक, भारतीय संघातील खेळाडू आणि मित्रांनी हजेरी लावली होती. दीपक आणि जया गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दीपकने जयाला आयपीएल सामन्यादरम्यान प्रपोज केलं होतं. आता सात फेरे घेतल्यानंतर हनिमूनला जाण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र यापूर्वी दीपक चाहरची बहिण मालती चाहरने आपल्या भावाला एक आपुलकीचा सल्ला दिला आहे. मालतीने हनीमूनबाबत एक ट्वीट केलं आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
"आता मुलगी आमची झाली आहे. दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. दीपक चाहर हनीमून दरम्यान आपल्या पाठीची काळजी घेशील. कारण तुला अजून वर्ल्ड कपही खेळायचा आहे.", असं ट्वीट मालती चाहर हिने केलं आहे.
Ab ladki hui humari….Wish you guys a very happy married life @deepak_chahar9 please take care of your back during your honeymoon..we have World Cup ahead #family #brother #marriage #siblings pic.twitter.com/Hm2unculO7
— Malti Chahar(@ChaharMalti) June 3, 2022
जया भारद्वाज टीव्ही स्टार सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. दीपक आणि जया यांची ओळख एक वर्षापूर्वी एका मित्राद्वारे झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि काही दिवसानंतर मैत्रीची रुपांतर प्रेमात झालं.