होळीच्या रंगात रंगली धोनीची झिवा...

होळी आणि रंगपंचमी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. 

Updated: Mar 3, 2018, 11:54 AM IST
होळीच्या रंगात रंगली धोनीची झिवा... title=

मुंबई : होळी आणि रंगपंचमी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कला, क्रिडा विश्वातील मंडळींही या सणाचा मनमुराद आनंद घेतला. या आनंदाला सोशल मीडियावर फोटोजच्या माध्यमातून उधाण आले होते. मात्र या फोटोजमध्ये एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या लाडक्या लेकीने झिवाने.

झिवाचा क्युट फोटो

इन्स्टाग्रामवर झिवाचा एक क्युट फोटो शेअर करण्यात आला. फोटोत रंगात रंगलेली झिवा आणि तिचे निर्मळ हसू फार मोहक दिसत आहे. या फोटोला अनेक लाईक्स मिळाले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही झाला.

 

Happy Holi !!!

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

 झिवाही बाबाप्रमाणे सेलिब्रिटी 

धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून ती झिवाचे फोटोज, व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे झिवाही बाबाप्रमाणे सेलिब्रिटी झाली आहे.