MS Dhoni: 'धोनी रागात खूप शिव्या द्यायचा…', इशांत शर्माने केली 'कॅप्टन कूल'ची पोलखोल!

Ishant Sharma interview:  टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा याने रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब शोमध्ये महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) विषयी मोठा खुलासा केला आहे.

Updated: Jun 26, 2023, 07:39 PM IST
MS Dhoni: 'धोनी रागात खूप शिव्या द्यायचा…', इशांत शर्माने केली 'कॅप्टन कूल'ची पोलखोल! title=
Ishant Sharma On MS Dhoni

Ishant Sharma On MS Dhoni: टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला 'कॅप्टन कूल' अशी ओळख मिळाली. मैदानात असताना शांत पद्धतीने परिस्थिती हाताळण्याची कमाल धोनी करू शकतो. प्रेशर सामन्यात धोनीने अनेक विजय देखील मिळवून दिले आहेत. अशातच आता टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब शोमध्ये मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला इशांत शर्मा?

महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) काही वेळा आपला संयम गमावला आहे. जेव्हा मी गोलंदाजी करताना लाईन आणि लेंथमध्ये चूक केली, तेव्हा त्याने मला शिवीगाळ देखील केली आहे. मात्र त्याच्या शिव्या या फार मनाला लागणाऱ्या नसतात. तो खूप प्रेमळ आहे, असं इशांत शर्मा म्हणाला आहे. 'कूल तो नहीं हैं, बहुत गाली देते हैं, मुझे भी बहुत दी है', असं म्हणत इशांत शर्माने कॅप्टन कूल टॅग पुसला आहे. धोनी शांत नाही पण त्याची विचार करण्याची क्षमता ही इतरांपेक्षा खूप जास्त आहे, असं इशांत शर्मा (Ishant Sharma On MS Dhoni) म्हणतो.

आणखी वाचा - कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...

कितीही यश मिळवलं असलं तरी धोनीला अजिबात गर्व नाही, त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहे, असं देखील इशांत शर्मा म्हणाला आहे. इशांत शर्माने मुलाखतीमध्ये विराट (Virat Kohli) आणि धोनीचा एक किस्सा देखील सांगितला. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळत होतो. शिखर धवनचा तो पदार्पणाचा सामना होता. शिखरच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात शिखरला फलंदाजी करता आली नाही. त्यावेळी विराट कोहलीच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी होती.

पाहा Video

दरम्यान, दुसऱ्या डावात कोहली देखील लवकर बाद झाला. पण हा कसोटी सामना आम्ही जिंकला होता. नंतर जेव्हा आम्ही हॉटेलच्या लिफ्टमध्ये होतो. तेव्हा धोनीने कोहलीला झापलं. तुला माहित होतं की आपल्याकडे कमी फलंदाज आहेत, मग तो फटका मारायची काय गरज होती? असं म्हणत धोनीने विराटला खडसावलं होतं, असंही इशांतने या मुलाखतीत म्हटलं आहे. धोनीने नेहमी महत्त्व काय आहे याची जाणीव करून दिली. माही भाई मला पण खूप काही सांगायचे पण एक मोठा भाऊ म्हणून सांगितलं. तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला ओरडतो, असं म्हणत तो समोरच्याचा राग शांत करायचा, असंही इशांत शर्मा म्हणालाय.