IPL 11 - अन महेंंद्रसिंंग धोनी झाला भावूक

आयपीएलचं 11 वे पर्व 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 

Updated: Mar 30, 2018, 06:20 PM IST
IPL 11  -  अन महेंंद्रसिंंग धोनी झाला भावूक   title=

मुंबई : आयपीएलचं 11 वे पर्व 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गेली दोन वर्ष चैन्नई सुपरकिंग्सची टीम पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. सध्या चैन्नई सुपरकिंगची टीम आयपीएलची टीम सराव करत आहे. मागील दोन वर्षांच्या अनुभवाबद्दल बोलताना महेंद्रसिंग धोनी भावूक झाला होता. 

इमोशन कंट्रोल करणारा धोनी 

एरवी महेंद्रसिंग धोनी त्याच्या भावनांवर खूप नियंत्रण ठेवून वागतो. मात्र चैन्नई सुपरकिंगच्या एका कार्यक्रमामध्ये मात्र त्याचा भावनांवरील ताबा सुटला होता. चाहत्यांशी बोलताना त्याचा गळा भरून आला होता. 

धोनीने व्यक्त केल्या भावना 

मागील दोन वर्ष धोनी पुण्याच्या संघातून खेळला. टी 20 हा प्रकार सुरू झाला तेव्हा मी भारताचं प्रतिनिधित्व करत होतो. त्यानंतर झारखंडच्या टीममधूनही मी काही दिवस खेळलो. पण चैन्नई सुपरकिंगसोबत माझा प्रवास 8 वर्षांचा होता. त्यामुळे पिवळ्या टीशर्टमध्ये पुन्हा येणं हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. अनेकदा आपल्याला दुसर्‍यांना नव्हे तर स्वतःसाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.  

 

यशस्वी कर्णधार  

एम एस धोनी हा यशस्वी कर्णधारांपैकी एक समजला जातो. त्याच्या नेतृत्त्वाखाली त्याच्या संघाने 2010 आणि 2011 साली विजेतेपद कमावलं होते. 10 पैकी 6 वेळेस त्याच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम सामन्यांपर्यंत पोहचली होती. 7 एप्रिलला चैन्नई सुपरकिंगचा सामना मुंबई इंडियन्सशी वानखेडेमध्ये होणार आहे.