क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आयसीसी

केपटाऊनमधील कसोटीत झालेल्या बॉल टेंपरिंग वादानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसी क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी आचारसंहिता, खेळाडूंची वर्तणूक आणि दोषींना दंड ठोठावण्याबाबतचे नियमांची पुन्हा समीक्षा केली जाणार आहे. आयसीसीच्या माहितीनुसार या समीक्षेमध्ये अनेक आजी-माजी क्रिकेटरर्सशिवाय क्रिकेट समिती, एमसीसी आणि मॅच अधिकाऱ्यांचा समावेश असेल. 

Updated: Mar 30, 2018, 01:42 PM IST
क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आयसीसी title=

नवी दिल्ली : केपटाऊनमधील कसोटीत झालेल्या बॉल टेंपरिंग वादानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसी क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी आचारसंहिता, खेळाडूंची वर्तणूक आणि दोषींना दंड ठोठावण्याबाबतचे नियमांची पुन्हा समीक्षा केली जाणार आहे. आयसीसीच्या माहितीनुसार या समीक्षेमध्ये अनेक आजी-माजी क्रिकेटरर्सशिवाय क्रिकेट समिती, एमसीसी आणि मॅच अधिकाऱ्यांचा समावेश असेल. 

आयसीसीने विधानात म्हटलंय की, गेल्या काही आठवड्यांमध्ये आम्ही खेळाडूंच्या गैरवर्तणुकीची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. यात स्लोजिंग, आऊट केल्यानंतर फलंदाजाशी गैरवर्तणूक, अंपायरच्या निर्णयाला असहमती आणि बॉल टेंपरिंग सारख्या वादांचा समावेश आहे. हल्लीच्या काही घटना लक्षात घेतल्या तर क्रिकेटमधील हा सगळ्यात वाईट काळ म्हणता येईल. बॉल टेंपरिंगच्या घटनेने तर जगाला दाखवून दिले की झाले तितके बस झाले. 

हे आहे प्रकरण

ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात २२ ते २४ मार्चदरम्यान खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बेनक्राफ्टने सँडपेपरच्या सहाय्याने बॉल घासला होता. यानंतर बॉल टेंपरिंगचा वाद चांगलाच चिघळला. याप्रकरणी दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि बेनक्राफ्ट यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातलीये.

क्रिकेटच्या नियमात बदल गरजेचे

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन म्हणाले, गेल्या काही आठवड्यांमध्ये जे घडले ते मागे सोडून पुढे जायला हवे. या घटनेतून सकारात्मक असे काही घेत पुढे जायला हवे. क्रिकेटवरील लोकांचा विश्वास कसा कायम राहील याकडे लक्ष द्यायला हवे. 

रिचर्डसन पुढे म्हणाले, २१व्या शतकात खेळ कसा झाला पाहिजे हे पाहण्यासाठी ही समीक्षा आयसीसीला संधी देईल. २१व्या शतकात खेळ कसा असला पाहिजे तसेच खेळाडूंच्या वर्तणुकीबाबतही समीक्षा झाली पाहिजे. आमचे दोन गोष्टींवर लक्ष असेल पहिली म्हणजे आचारसंहिता. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही स्प्रिट ऑफ क्रिकेड कोड बनवणार आहोत. ज्यात खेळ खेळण्याबाबतचा हेतू स्पष्ट केलेला असेल. सध्याची संहिता गेल्या अनेक वर्षांपासून चांगली काम करतेय. मात्र आजचा खेळ पाहता त्यात बदल अपरिहार्य आहे.