IND vs SA 1st ODI : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि दक्षिण अफ्रिकेचे संघ आमने सामने आले आहेत. टी-ट्वेंटी मालिकेत भारताने विजयाचा दसरा साजरा केला. त्यानंतर आता दोन्ही संघात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी (ICC T20 World Cup 2022) भारतीय गोलंदाजी डोकेदुखीचं कारण ठरली असतानाच आता भारताची फिल्डिंग देखील रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) चिंतेचा विषय ठरल्याचं दिसत आहे. (Lucknow Ball boy Catch Video in Ind vs Sa 1st odi Mohammad Siraj dropped the catch marathi sport news)
भारत आणि दक्षिण अफ्रिकामध्ये (IND vs SA 1st ODI) सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय खेळाडूंची गचाळ फिल्डिंग पहायला मिळाली. शुभमन गिल, मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) फिल्डिंग करताना कॅच सोडले. आवेश खानच्या बॉलिंगवर फिल्डिंग करताना एकामागोमाग दोन कॅच सोडल्याने फॅन्सने जोरदार टीका सुरू केली आहे.
शार्दुलच्या गोलंदाजीवर देखील शुभमन गिलने कॅच सोडला. त्यामुळे चाहत्यांचा सामना पाहता हिरमोड झाला. दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंना त्यामुळं जीवदान मिळालं. मात्र, या सामन्यातील एका व्हिडीओमुळे भारतीय खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. मागील टी-ट्वेंटी सामन्यात देखील सिराजने दोन महत्त्वाचे कॅच सोडले होते.
अखेरच्या षटकात दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंनी तुफान फटकेबाजी सुरू केली. मिलर (David Miller) आणि हेनरिक क्लासेनने (Heinrich Klassen) आक्रमक फटके मारले. त्यावेळी हेनरिक क्लासेनने मारलेल्या एका षटकारावर बॉड्रीच्या बाहेर उभा असलेल्या बॉल बॉयने भन्नाट कॅच घेतला. बॉल बॉयचा हा कॅच (Lucknow Ball boy Catch Video) बॉड्रीवर उभा असलेला अय्यर देखील पाहतच राहिला.
What a catch! #INDvSA #ODI #Siraj #Shardulthakur #Bishnoi #RuturajGaikwad Catches #T20WorldCup2022 pic.twitter.com/rrCdhTlaHv
— Sweet Sound of Willow (@kookaburra_bat) October 6, 2022
आणखी वाचा - विराट कोहलीकडून ऋषभ पंतचा अपमान... Video होतोय व्हायरल, नेटकरी संतापले
दरम्यान, पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने 40 षटकात 249 धावा केल्या आहेत. पावसामुळे दोन्ही संघात 40-40 ओव्हरचे सामने खेळले जात आहेत. दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या 250 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने आत्तापर्यंत 2 आऊट 18 रन केले आहेत.