मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला या मोसमात आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. या पराभवाला मुंबईची वाईट कामिगरी कारणीभूत आहे. (lsg vs mi ipl 2022 mumbai indians star opener unsuccesful last 6 innings netizens trolled on social media)
मुंबई फ्रँचायजीने ओपनर इशान किशनसाठी (Ishan Kishan) सर्वाधिक 15 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. इशान या हंगामातील महागडा खेळाडू ठरला. मात्र इशानला विशेष कामगिरी करता आली नाही.
It comes in 50 rupees, but still a better opener than that 15 cr Ishan Kishan pic.twitter.com/LjSLmfPOt6
— (@kurkureter) April 24, 2022
इशान रविवारी 24 एप्रिलला लखनऊ विरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला. टीमला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी ही ओपनरची असते. मात्र इशानला विशेष काही करता आलं नाही. यानंतर इशानला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
इशानला 15 कोटी देण्यापेक्षा 50 रुपयात चांगला 'ओपनर' आला असता, असं उपरोधिक ट्विट एका नेटीझनने केलंय.
इशानने या मोसमातील 8 सामन्यात 28.43 च्या एव्हरेजने 199 धावा केल्या आहेत. इशानने पहिल्या 2 सामन्यांमध्ये अनुक्रमे नाबाद 81 आणि 54 धावा केल्या. मात्र यानंतर त्याने फॉर्म गमावला.
इशानने मागील 6 सामन्यात अनुक्रमे पिछली छह पारियों में रहे फ्लॉप 14, 26, 3, 13, 0 आणि 8 धावा केल्या.