LSG vs GT : W,W,W,W... मोहित शर्माने जिंकवून दिला हरलेला सामना; गुजरातचा थरारक विजय

या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊच्या घरच्याच मैदानावर पराभव केलाय. या सामन्यामध्ये गुजरातने लखनऊचा 7 रन्सने पराभव केला आहे

Updated: Apr 22, 2023, 07:54 PM IST
LSG vs GT : W,W,W,W... मोहित शर्माने जिंकवून दिला हरलेला सामना; गुजरातचा थरारक विजय title=

LSG vs GT : लखनऊच्या इकाना स्टेडियमवर आज लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध  गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊच्या घरच्याच मैदानावर पराभव केलाय. या सामन्यामध्ये गुजरातने लखनऊचा 7 रन्सने पराभव केला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो गोलंदाज मोहित शर्मा. शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊचे 4 विकेट्स काढत त्याने सामना जिंकवून दिला.

केएल राहुलंचं (KL Rahul) अर्धशतक व्यर्थ

आजच्या सामन्यात लखनऊ टीमचा कर्णधार केएल राहुलने अर्धशतक झळकावलंय. राहुलने आजच्या सामन्यात 38 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. तर आज त्याने 61 बॉल्समध्ये 68 रन्सची खेळी केली. त्याच्या या संध खेळीमुळे लखनऊला पराभवाच्या छायेत  त्याच्या या खेळीमुळे टीमने विजय मिळवला. तर केएल राहुलचं हे यंदाच्या आयपीएलमधील दुसरं अर्धशतक होतं. पंजाबविरूद्धच्या सामन्यात राहुलने 74 रन्सची खेळी केली होती.

गुजरातकडून अवघ्या 136 रन्सचं आव्हान

आजच्या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गुजरातने सहा विकेट्स गमावत 20 ओव्हर्समध्ये अवघे 135 रन्स केले. यावेळी गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक म्हणजेच 66 रन्स केले तर दुसरीकडे वृद्धिमान सहाने 47 रन्सची खेळी केली. मात्र इतक्या मोजक्या रन्सचं आव्हान पूर्ण करताना लखनऊच्या नाकीनऊ आलं. 

दुसरीकडे लखनऊकडून कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतलेत. नवीन-उल-हक आणि अमित मिश्राला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही टीम्सची प्लेईंग 11 

लखनऊ सुपर जाएंट्स: केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पांड्या, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, निकोलस पूरन (विकेटकीपर), अमित मिश्रा, आवेश खान, रवि बिश्नोई, आयुष बदोनी, नवीन उल हक

सब्सटीट्यूटः कृष्णप्पा गौतम, डेनियल सम्स, प्रेरक मांकड, जयदेव उनादकट, कर्ण शर्मा 

गुजरात टायटन्स: हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेविड मिलर, नूर अहमद, मोहित शर्मा, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी

सब्सटीट्यूटः साई किशोर, श्रीकर भरत, जयंत यादव, जोश लिटिल, शिवम मावी,