मुंबई : आयपीएलमध्ये चौथा सामना गुजरात विरुद्ध लखनऊ झाला. या सामन्यात गुजरात संघाने 5 विकेट्सने लखनऊवर मात केली. लखनऊ टीमने पहिली फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. तर गुजरातने 5 विकेट्स गमावून सामना जिंकला आहे. लखनऊचा पराभव करूनही गुजरात कर्णधार हार्दिक पांड्या स्वत: खुश नाही.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने लखनऊवर 5 गडी राखून विजय मिळवला. विजयानंतर हार्दिक पांड्याने आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्याने नाराजी व्यक्त केली. फलंदाजीमध्ये अधिक जबाबदारपणे खेळायला हवं असं तो बोलताना म्हणाला. ICC T20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच हार्दिकने 28 बॉलमध्ये 33 धावा केल्या आहेत.
लखनऊ विरुद्ध खेळताना 28 बॉलमध्ये 33 धावा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय त्याने 4 ओव्हर बॉलिंग केली. लखनऊ टीमला धूळ चारत गुजरातने विजय मिळवला आहे. मला फलंदाजीमध्ये जास्त जबाबदारी घ्यायची होती. त्याने मोहम्मद शमीचं कौतुकही केलं आहे.
मी फक्त चांगल्या लाईन आणि लेंथवर बॉलिंग करायची होती असं शमी म्हणाला. पावर प्लेमध्ये 3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्याला चौथी ओव्हर देखील देण्याचा पांड्याचा विचार होता पण शमीने नकार दिला.