अंबाती रायडूच्या 'दुश्मन'ची मॅचमध्ये फजिती, यॉर्करने केला खेळ खल्लास

अंबाती रायडूची जागा घेऊ पाहणाऱ्या क्रिकेटपटूची दांडी गुल, मान खाली घालून मैदान सोडण्याची वेळ

Updated: Mar 29, 2022, 01:09 PM IST
अंबाती रायडूच्या 'दुश्मन'ची मॅचमध्ये फजिती, यॉर्करने केला खेळ खल्लास title=

मुंबई : टीम इंडियामध्ये 3 वर्षांपूर्वी वर्ल्ड कपसाठी अंबाती राडयूची ऐवजी ज्या क्रिकेटपटूला प्राधान्य दिलं आज त्याच खेळाडूची मॅचमध्ये मोठी फजिती झाली. त्याच्यावर मैदानातून मान खाली घालून बाहेर पडण्याची वेळ आली. अंबाती रायडूला त्या क्रिकेटपटूला निवड समितीने टीममधून बाजूला केलं होतं.

गुजरात विरुद्ध लखनऊ सामना सोमवारी झाला. या सामन्यात गुजरात संघाने लखनऊवर विजय मिळवला. गुजरातकडून मैदानात बॅटिंग करण्यासाठी ऑलराउंडर खेळाडू विजय शंकर उतरला. क्रीझवर येताच त्याला संपूर्ण जगासमोर मान खाली घालून परत तंबुत जाण्याची वेळ आली. 

विजय शंकरला केवळ 6 बॉलमध्ये 4 धावा करण्यात यश आलं. त्यानंतरच्या बॉलवर त्याची दांडी गुल झाली आणि तंबुत परतावं लागलं. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या एका गोष्टीमुळे अंबाती रायडू आणि विजय शंकर एकमेकांचे शत्रू बनले. 

लखनऊचा वेगवान बॉलर दुश्मंथा चमीराने विजय शंकरला यॉर्कर टाकून आऊट केलं. विजय शंकरकडून गुजरात टीमला खूप अपेक्षा होत्या. तो आऊट होताच सगळ्या अपेक्षा भंग झाल्या. क्लीन बोल्ड झाल्यानंतर विजय मान खाली घालून तंबुत परतला. 

विजय शंकरला 3D प्लेअर असं म्हटलं जातं. मात्र गेल्या तीन वर्षांत 1D पण दिसलं नाही. विजय शंकरचा क्लीन बोल्ड होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे त्याची खिल्लीही उडवण्यात आली. त्याला सोशल मीडियावर युजर्सनी ट्रोल केलं. 

विजय शंकरमुळे अंबातीवर अन्याय
रायडूने 2019 मध्ये चौथ्या क्रमांकावरचा सर्वात मोठा बॅटिंग प्लेअर मानला जात होता. मात्र त्याला 15 जणांच्या टीममध्ये देखील घेण्यात आलं नाही. रायडू ऐवजी विजय शंकरला खेळण्याची संधी दिली. टीममध्ये अंबाती रायडू ऐवजी विजयला जागा दिल्याने त्यावरून वाद झाला होता. 

अंबाती रायडूने निराश होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. हा वाद संपूर्ण जगासमोर आला. विजय शंकरने रायडूची जागा घेतल्याने त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. विजय शंकरनेही यावर प्रतिक्रिया दिली होती. अंबाती रायडूबद्दल मला कोणतीच तक्रार नाही असंही त्यावेळी विजय शंकर बोलला होता.