कोलकाता : कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सलामीवीर लोकेश राहुलच्या नावे खराब रेकॉर्डची नोंद झालीये. कसोटीमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरलाय.
कोलकाताच्या ईडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लोकेश राहुल शून्यावर बाद झालाय. सुरंगा लकमलच्या चेंडूवर लोकेश बाद झाला.
आजपासून श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला सुरुवात झालीये. मात्र पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारताचे तीन गडी बाद १७ धावा झाल्या होत्या.
सर्वाधिक शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड गावस्करांच्या नावे
सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा रेकॉर्ड भारताच्या सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. सुनील गावस्कर(३ वेळा) आणि बांगलादेशचा हनन सरकार (३ वेळा) यांच्या नावावर आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर पहिल्याच चेंडूवर भारताचे तीन फलंदाज बाद झाले. सर्वात आधी सुनील गावस्कर(१९४७), त्यानंतर एस एस नाईक (१९७४) आणि लोकेश राहुल (२०१७) आहेत. सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्या भारतीय क्रिकेटर्सची नावे - सुनील गावस्कर, एस नाईक, रमन लांबा, एस एस दास, वसीम जाफर, लोकेश राहुल.