LSG vs MI highlights, IPL 2024 : लखनऊकडून मुंबईचा 'अदबसे' पराभव, पलटणवर 4 विकेट्सने विजय

LSG vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 48 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जाएंट्सचा सामना लखनऊचे होमग्राउंड असलेल्या अटल बिहारी वाजपेयी एकाणा क्रिकेट स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्ससोबत (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) होणार आहे.   

LSG vs MI highlights, IPL 2024 : लखनऊकडून मुंबईचा 'अदबसे' पराभव, पलटणवर 4 विकेट्सने विजय

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत लखनऊने 9 पैकी 5 सामने जिंकत 10 पॉइंट्ससोबत,पॉइंट्स टेबलच्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर याउलट मुंबई इंडियन्सचा संघ या आयपीएलमध्ये आतापर्यंत आपली लय मिळाललेली नाहीये. मुंबईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये 9 पैकी फक्त 6 पॉइंट्ससोबत 9 व्या स्थानावर आहे. तर बघण्यायोग्य असणार की कोणता संघ आपले तगडे प्रदर्शन दाखवत आज वरचढ ठरणार.

30 Apr 2024, 23:27 वाजता

लखनऊ सुपर जाएंट्सने, आपल्या होमग्राउंडवर मुंबई इंडियन्सला 4 विकेट्सने पराभूत केलं आहे. यासोबतचं महत्वाचे 2 पॉइंट्स मिळवुन लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफसाठी क्वॉलिफाय करणं आणखी कठिण झालं आहे.

30 Apr 2024, 23:09 वाजता

18 व्या ओव्हरमध्ये कोएट्झने टर्नरला 5 धावांवर आउट केलं आहे. पाचव्या विकेटनंतर आयुष बदोनी हा फलंदाजीसाठी आला आहे.

30 Apr 2024, 22:53 वाजता

मोहम्मद नबीच्या 15 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा धाकड फलंदाज मार्कस स्टॉयनिस हा 62 धावांवर आउट झाला आहे. लखनऊकडून आता फलंदाजीसाठी मैदानात निकोलस पूरन आणि टर्नर खेळत आहेत आणि लखनऊचा स्कोर आहे 116-4.

30 Apr 2024, 22:46 वाजता

हार्दिक पांड्याच्या 13 व्या ओव्हरमध्ये दिपक हूड्डा हा 18 धावांवर आउट झाला आहे, तर मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये, 6 चौकार आणि1 षटाकराच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

30 Apr 2024, 22:27 वाजता

10 ओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा स्कोर आहे 79-2.  मार्कस स्टॉयनिस 39 धावांवर खेळत असून त्याने लखनऊच्या फलंदाजीची एक बाजू सांभाळून ठेवली आहे, तर दिपक हूडा पण 10 धावांवर खेळत आहे. लखऊला जिंकण्यासाठी 60 बॉलमध्ये 66 धावांची गरज आहे. 

30 Apr 2024, 22:19 वाजता

हार्दिक पांड्याच्या 8 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा कॅप्टन के एल राहूल हा 28 धावांवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर मैदानावर फलंदाजीसाठी दिपक हूड्डा हा आलाय.

30 Apr 2024, 22:03 वाजता

5 ओव्हरनंतर लखनऊचा स्कोर 46-1 असा आहे. के एल राहूल हा 25 धावांवर खेळतोय, तर स्टॉयनिस हा 19 धावांवर खेळत आहेत. या दोघांमध्ये एक चांगली भागीदारी होत आहे व मुंबईच्या गोलंदाजांना आता ही भागीदारी तोडणं गरजेचं झालं आहे.

30 Apr 2024, 21:44 वाजता

पहिल्याच ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जाएंंट्सला पहिला धक्का बसला आहे. अर्शिन कुलकर्णी हा आपल्या आयपीएल करिअरच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर मार्कस स्टॉयनिस हा फलंदाजी करण्यासाठी आलाय.

30 Apr 2024, 21:17 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबई इंडियन्सने, लखनऊ सुपर जाएंट्सला 145 धावांचे लक्ष दिले आहे. मुंबईकडून फलंदाजीमध्ये निराशाजनक प्रदर्शन झाले आहे. नेहाल वढेरा याने 46 धावांचे चांगले योगदान दिले आहे, तर इशान किशन याने पण 32 धावांची खेळी खेळलीये आणि टीम डेविडने शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करून 35 धावांची ताबडतोब खेळी खेळलेली आहे. लखनऊकडून गोलंदाजीत उत्कृष्ट प्रदर्शन झाले आहे. मोहसिन खानने 2 विकेट घेतल्याये, तर स्टॉयनिस, नवीन उल हक, मयंक यादव आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार मुंबई इंडियन्स या 145 धावांच्या आव्हानाला, लखनऊच्या घातक फलंदाजीपासून वाचवू शकतात की नाही? 

30 Apr 2024, 21:05 वाजता

18 व्या ओव्हरमध्ये मोहसिन खान याने या मॅचची दुसरी विकेट घेतली आहे. नेहाल वढेरा हा 46 धावांवर आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर मोहम्मद नबी हा फलंदाजीसाठी आला आहे.