KKR vs LSG : ईडन गार्डनवर केकेआरचाच बोलबाला, लखनऊवर 8 विकेट्सने पराभव

KKR vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना ईडन गार्डन्सवर लखनऊ सुपर जायंट्ससोबत होत आहे. त्यामुळे सामना कोणाच्या बाजूने झुकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

KKR vs LSG : ईडन गार्डनवर केकेआरचाच बोलबाला, लखनऊवर 8 विकेट्सने पराभव

KKR vs LSG Live Score in Marathi : आज आयपीएलच्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) लखनऊ सुपरजायंट्स आमने सामने असणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जातोय. कोलकाता आणि लखनऊ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. आजच्या सामन्यात केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करणार आहे. तर केएल राहुल (KL Rahul) एलएसजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

14 Apr 2024, 19:21 वाजता

केकेआरने आपल्या होमग्राउंडवर लखनऊ सुपर जाएंट्सला 8 विकेट्सने एकतर्फी पराभूत केलं आहे. केकेआरच्या फिलिप सॉल्टने 89 धावांची ताबडतोब खेळी खेळून लखनऊच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. सॉल्टच्या साथीला केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनेसुद्धा 38 धावांची खेळी खेळून केकेआरला सोपा विजय मिळवला आहे आणि पॉइंट्स टेबलमध्ये 2 गुण मिळवुन दुसरे स्थान काबिज केलं आहे.

14 Apr 2024, 18:57 वाजता

16 व्या ओव्हरमध्ये फिलिप सॉल्टच्या 89 धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे केकेआरने लखनऊला 8 विकेट्सने पराभूत केलं आहे. 

14 Apr 2024, 18:25 वाजता

10 व्या ओव्हरनंतर केकआरचा स्कोर 101- 1असा आहे. फिल सॉल्ट हा 51 धावांची उत्तम अर्धशतकीय खेळी खेळत नाबाद आहे, तर अय्यर सुद्धा 21 वर खेळत सॉल्टचे साथ देत आहे. सॉल्ट आणि अय्यरमध्ये एकूण 59 धावांची मजबूत भागीदारी झाली आहे. 

14 Apr 2024, 17:58 वाजता

पाचव्या ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 49-2 असा आहे.अय्यर 5 धावांवर खेळत असून, सॉल्ट हा 21 वर नाबाद आहे. केकेआरला मॅचमध्ये परत येण्यासाठी आता एक चांगल्या भागीदारीची गरज आहे.

14 Apr 2024, 17:54 वाजता

मोहसिन खानने परत एकदा चौथ्या ओव्हरमध्ये इन फॉर्म अंगक्रिश रघुवंशीला 6 च्या स्कोरवर आउट केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर हा फलंदाजीसाठी आला आहे.

14 Apr 2024, 17:48 वाजता

लखनऊचा गोलंदाज मोहसिन खानच्या ओव्हरमध्ये केकेआरचा घातक फलंदाज सुनिल नरेन हा फक्त 6 धावा करून आउट झाला आहे. पहिल्या विकेट नंतर रघुवंशी फलंदाजीसाठी आला आहे.

14 Apr 2024, 17:23 वाजता

20 ओव्हरनंतर लखनऊ सुपर जाएंट्सने केकेआरसमोर 162 धावांचे लक्ष दिले आहे. लखनऊची बॅटिंग इनिंगच्या सुरूवातीला थोडी डगमगली होती, पण निकोलस पुरनच्या 45 धावा आणि बदोनीच्या 29 धावांच्या मदतीने लखनऊ 161 धावांपर्यंत पोहोचली आहे. लखनऊचा कॅप्टन के एल राहुल यानेसुद्धा 39 धावांचे योगदान देऊन टीमला कठीण परिस्थितीतून सावरले आहे. कोलकाताकडून मिचेल स्टार्कने 3, तर वैभव अरोरा, नरेन, चक्रवर्ती आणि रसेल या चौघं गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या आहेत.

तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआरच्या होमग्राउंडवर लखनऊ आपल्या गोलंदाजांच्या मदतीने आपलं आदब दाखवत कोलकाताच्या फलंदाजीला रोखू शकणार की नाही?

14 Apr 2024, 16:46 वाजता

लखनऊला आयुष बदोनीच्या स्वरूपात पाचवा धक्का लागला आहे. नरेनच्या गोलंदाजीवर बदोनी हा 29 धावा बनवुन आउट झाला आहे. 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊचा स्कोर 113-5 असा आहे.

14 Apr 2024, 16:32 वाजता

वरूण चक्रवर्तीच्या 12 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा धाकड फलंदाज मार्कस स्टॉयनिस हा 10 धावांवर बाद झाला आहे. चौथ्या विकेट नंतर निकोलस पूरन हा मैदानात आला आहे.

14 Apr 2024, 16:27 वाजता

11 व्या आंद्रे रसलच्या ओव्हरमध्ये लखनऊचा कॅप्टन के एल राहूल हा आपलं अर्धशतक बनवण्यात अपयशी ठरला आहे, राहूल हा 39 धावा बनवुन बाद झाला आहे.