टेनिस: प्रदीर्घ काळानंतर सेरेना विल्यम पुनरागमनासाठी तयार

या पूर्वीही सेरेनाचा टेनिस कोर्टवर जोरदार दबदबा राहिला आहे. हाच दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी ती कोर्टवर पुनश्च पदार्पण करत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 11, 2018, 11:56 AM IST
टेनिस: प्रदीर्घ काळानंतर सेरेना विल्यम पुनरागमनासाठी तयार title=

एश्विले (अमेरिका) : एक दोन नव्हे तर, तब्बल २३ वेला ग्रॅणड स्लॅम विजेती अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम प्रदीर्घ काळानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या पूर्वीही सेरेनाचा टेनिस कोर्टवर जोरदार दबदबा राहिला आहे. हाच दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी ती कोर्टवर पुनश्च पदार्पण करत आहे.

मला काहीच सिद्ध करायचे नाही - सेरेना

फेड कप टूर्नामेंट दरम्यान सेरेना टेनिस कार्टवर पुनरागमन करणार आहे. फेड कपमध्ये अमेरिके विरूद्ध हॉलंड मैदानात असणार आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सेरेना म्हणाली, मधल्या काळात मी टेनिस कोर्टपासून दूर होते. हा काळ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या काळात मला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. महत्त्वाचे असे की आता माला काहीही सिद्ध करायचे नाही.

गर्भारपणामुले टेनिस कोर्टपासून होती दूर

सेरेना विल्यम सध्या ३६ वर्षांची आहे. गेल्याच वर्षी तिने लग्न केले. त्यानंतर गरोदर राहिल्याने गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून तिने टेनिस कोर्टपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, गेल्या सप्टेबर महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. एलेक्सिस ओलंपिया असे तिच्या मुलीचे नाव आहे.