Viral Video : मीडियासमोर हेडलने उडवली युवराज सिंगची खिल्ली, पाहा सर्वांसमोर काय म्हणाली?

Hazel Keech Angry On Yuvraj Singh : बायकोसमोर नवऱ्याचं काही चालतं का? असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येकाच्या घरी हुकूमशाही चालते ती बायकोची.. मग याला सेलिब्रिटी देखील अपवाद नाहीत. 

सौरभ तळेकर | Updated: Dec 2, 2023, 06:25 PM IST
Viral Video : मीडियासमोर हेडलने उडवली युवराज सिंगची खिल्ली, पाहा सर्वांसमोर काय म्हणाली?  title=
Yuvraj Singh, Hazel Keech

Yuvraj Singh Viral Video : टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या माजी स्टार क्रिकेटरने म्हणजेच युवराज सिंग (Yuvraj Singh) याने दोन दिवसापूर्वी आपल्या लग्नाचा 7 वा वाढदिवस साजरा केलाय. हेजलने (Hazel Keech) मागील ऑगस्ट महिन्यात एका मुलीला जन्म दिला होता. युवीची लाडकी मुलगी 4 महिन्यांची झाल्यावर त्यांनी आपल्या मुलीचा एक गोंडस फोटो शेअर केला होता. त्यामुळे युवराज आणि हेजलची जोडी चर्चेच्या केंद्रस्थानी होती. अशातच आता या कपलचा नवा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. यामध्ये मीडियासमोर हेडल युवराजला रागवताना दिसत आहे.

बायकोसमोर नवऱ्याचं काही चालतं का? असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येकाच्या घरी हुकूमशाही चालते ती बायकोची.. मग याला सेलिब्रिटी देखील अपवाद नाहीत. अशातच आता सिक्सर किंग युवीच्या घरी कोणाची दरारा आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हेजल केच मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये संभाषण करताना दिसते. तर दुसरीकडे युवराज सिंग कडक ब्लॅक सुटमध्ये बाजुला उभा राहिलाय. हेजल बोलायला लागल्यावर काय होतं पाहा...

रेडिटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हेजल हिंदीमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिसते. त्याचवेळी बाजूला उभा असलेल्या युवराजला हसू अनावर झालं. हेजलची हिंदी ऐकून त्यालाही हसू फुटलं. युवराज गालातल्या गालात हसला मात्र, युवी आपली मस्करी करत असल्याचं हेजलच्या लक्षात आलं. त्यावेळी हेजलने सर्वांसमोर युवीची खरडपट्टी काढली. तू का हसतोय? मी इथं हिंदीमध्ये बोलतीये यामुळे का? असा खडा सवाल हेजलने विचारला. त्यावर युवराजने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हेजलचा पारा चढला होता. हेजलने युवीला शांत राहण्याची तंबी दिली. तू शांत उभा रहा, असं हेजलने युवीला ठणकावून सांगितलं. मात्र, युवराजच्या हसू थांबत नव्हतं.

पाहा Video

They way hazel said kyun has rahe hai is so cute
byu/Plastic_Problem4507 inBollyBlindsNGossip

दरम्यान, ऑगस्टमध्ये हेजल आणि युवराज दुसऱ्यांदा पालक झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली मुलगी ऑराच्या जन्माची माहिती दिली होती. युवराज सिंह आणि हेजल कीच यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. हेजलने 2022 मध्ये मुलाला जन्म दिला. त्याच्या मुलाचे नाव ओरियन आहे.