Harshit Rana : मयंक अग्रवालला फ्लाईंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात, BCCI ने केली थेट कारवाई

Harshit Rana Flying Kiss to mayank Agrawal : कोलकाताचा गोलंदाज हर्षित राणाने सामन्यादरम्यान त्याने दोनदा असं कृत्य केलं ज्यामुळे त्याला (IPL Code of Conduct) मोठा दंड ठोठावण्यात आलाय.

सौरभ तळेकर | Updated: Mar 24, 2024, 03:52 PM IST
Harshit Rana : मयंक अग्रवालला फ्लाईंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात, BCCI ने केली थेट कारवाई title=
Mayank Agarwal, Harshit Rana IPL Code of Conduct

IPL Code of Conduct : कोलकाता नाईट रायडर्स आणि सरायजर्स हैदाराबाद यांच्यात खेळवला गेलेल्या सामन्यात (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) कोलकाताने हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. अखेरच्या बॉलपर्यंत झालेल्या थ्रिलर लढतीत हर्षित राणा (Harshit Rana) याने खेळ पलटवला. हर्षित राणाने अंतिम षटकात शानदार गोलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. हैदराबादला विजयासाठी एका बॉलमध्ये 5 धावांची गरज होती. मात्र, कॅप्टन पॅट कमिन्सला अखेरच्या बॉलवर मोठी हिट मारता आली नाही. हर्षित राणाच्या सुयेश शर्माच्या एका कॅचने सामना फिरला तो कोलकाताच्या पारड्यात... मात्र, या सामन्यात हर्षित राणाच्या अॅग्रेशनने लक्ष वेधलं. अशातच आता यामुळेच हर्षित राणावर बीसीसीआयने (BCCI) कारवाई केली आहे.

हर्षित राणाला आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला. आचारसंहितेचे दोन लेव्हल 1 उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या दंड ठोठावण्यात आलाय. अनुच्छेद 2.5 नुसार "भाषा, कृती किंवा हावभाव वापरणं ज्याचा अपमान होतो किंवा जे सामन्यातील दुसऱ्या खेळाडूकडून आक्रमक प्रतिक्रिया निर्माण करू शकते"

झालं असं की, मयंक आणि अभिषेक हैदराबादसाठी सलामीला आले होते. दोघांनी आक्रमक सुरूवात करून दिली. त्यावेळी सहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षित राणाने मयंकला बाद केलं. त्यावेळी मयंक बाद झाल्यावर हर्षितने मयंक अग्रवालला जाता जाता फ्लाईंग किस दिली अन् बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे मॅचमधील वातावरण काही सेकंदासाठी तापल्याचं दिसून आलं. अशातच आता मयंकला फ्लाईंग किस देणं आता हर्षित राणाला महागात पडलं आहे.

दरम्यान, आंद्रे रसेलच्या ( Andre Russell) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाताने 208 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना हैदराबादच्या हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) 29 बॉलमध्ये झंजावती 69 धावांची खेळी केली.

सनरायझर्स हैदराबादचा संघ -  मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्सचा संघ - फिलिप सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (c), नितीश राणा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.