मुंबईच्या Kieron Pollardची बॅट तळपली! एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 'इतक्या' धावा

Kieron Pollard : युएईमध्ये (UAE) खेळवल्या जात असलेल्या इंटरनेशनल टी20 लीगमध्ये शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी एमआय एमिरेट्स (MI Emirates) विरुद्ध अबू धाबी नाइट रायडर्स (Abu Dhabi Knight Riders)यांच्यात सामना रंगला. या सामन्य़ात फॅन्सना कायरन पोलार्डची वादळी खेळी पाहायला मिळाली.

Updated: Feb 4, 2023, 07:43 PM IST
मुंबईच्या Kieron Pollardची बॅट तळपली! एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 'इतक्या' धावा title=

ILT20 2023: मुंबईच्या कायरन पोलार्डची (Kieron Pollard) बॅट इंटरनेशनल टी20 लीगमध्ये चांगलीच तळपली आहे.अबू धाबी नाईट राईडर्स विरूद्धच्या सामन्यात त्याने वादळी खेळी केली आहे. या वादळी खेळीने एमआय एमिरेट्सने (MI Emirates) अबू धाबी नाईट राईडर्स (Abu Dhabi Knight Riders) विरूद्धचा सामना 18 धावांनी सामना जिंकला आहे. या विजयासह एमआय एमिरेट्सने प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केले आहे. त्यामुळे मुंबईच्या फॅन्सना दिलासा मिळाला आहे. 

 

हे ही वाचा : टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या

 

युएईमध्ये (UAE) खेळवल्या जात असलेल्या इंटरनेशनल टी20 लीगमध्ये शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी एमआय एमिरेट्स (MI Emirates) विरुद्ध अबू धाबी नाइट रायडर्स (Abu Dhabi Knight Riders)यांच्यात सामना रंगला. या सामन्य़ात फॅन्सना कायरन पोलार्डची वादळी खेळी पाहायला मिळाली. पोलार्डने या सामन्यात 17 बॉलमध्ये 43 धावा काढल्या.या त्यांच्या तुफानी खेळीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वेस्ट इंडिजच्या बॉलरचीच धूलाई

कायरन पोलार्डने (Kieron Pollard) आपल्याच देशाच्या म्हणजेच वेस्ट इंडिजच्याच आंद्रे रसेलची धुलाई केली आहे. पोलार्डने आंद्रे रसेलच्या ओव्हरमध्ये सिक्स आणि चौकारांची बरसात करत 26 धावा काढल्या आहेत. त्याच्या या खेळीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

अबू धाबी नाइट रायडर्सचा कर्णधार सुनील नरेन 17 वी ओव्हर आंद्रे रसेलला टाकण्यास दिली होती. या ओव्हरपूर्वी एमआय एमिरेट्सने 17 ओव्हरमध्ये 3 बाद 131 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी एमआय एमिरेट्स संघ 160 धावांपर्यंत पोहोचू शकेल असे वाटले देखील नव्हते, मात्र पोलार्डने ते करून दाखवले.  

आंद्रे रसेलची महागडी ओव्हर

  • पहिला बॉल : रसेलच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्ड (Kieron Pollard) नशीबवान ठरला, आणि बॉल सीमापार चौकार गेला
  • दुसरा बॉल : दुसऱ्या बॉलवर पोलार्डने पुल शॉट मारून पुन्हा चौकार खेचला
  • तिसरा बॉल : तिसऱ्या चेंडूवर पोलार्डला फक्त दोनच धावा काढता आल्या
  • चौथा बॉल : पहिल्या तीन बॉल खुपच महागडे ठरल्यानंतर त्याने चौथा बॉल स्लो शॉर्ट पिच टाकला आणि पोलार्डने खणखणीत सिक्स खेचला. 
  • पाचवा  बॉल : पाचव्या चेंडूवर पोलार्डने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला. 
  • सहावा बॉल : शेवटच्या चेंडूवर रसेल यॉर्कर टाकायला गेला, पण तो फुल टॉस गेला आणि लाँग-ऑनच्या दिशेने पोलार्डने सिक्स मारला. 

एमआयने प्रथम फलंदाजी करताना पोलार्डच्या (Kieron Pollard) 43 धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर अबू धाबी नाइट रायडर्ससमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या अबुधाबीचा संपूर्ण संघ 162 धावांवर आटोपला होता. त्यामुळे एमआय एमिरेट्सने अबू धाबी नाइट रायडर्सवर (Abu Dhabi Knight Riders) 18 धावांनी विजय मिळवला. या खेळीच्या जोरावर पोलार्डला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. आता या विजयासह एमआयने प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केले आहे.