किदम्बी श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकणारा भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणखी एक जेतेपद जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल दूर आहे. 

Updated: Jun 24, 2017, 07:10 PM IST
किदम्बी श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये title=

सिडनी : इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकणारा भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणखी एक जेतेपद जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल दूर आहे. 

जबरदस्त फॉर्मात असलेला किदम्बी श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. सेमीफायनलमध्ये त्याने चीनच्या चौथ्या सीडेड २१-१०, २१-१४ असे सरळ दोन गेममध्ये हरवत फायनल गाठलीये.

सिंगापूर ओपन, इंडोनेशिया ओपनंतर सलग तिसऱ्यांदा तो अंतिम फेरीत पोहोचलाय. सिंगापूर ओपनमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर त्याने गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया ओपनचे जेतेपद पटकावले. त्यानंतर आता श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय.