Rohit Sharma: टीम इंडियाने अखेर दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव करत पहिल्या टेस्ट सामन्यातील वचपा काढला. दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत केपटाऊनमध्ये नवा इतिहास रचला. पहिला टेस्ट सामना तिसऱ्या दिवशी तर दुसरा टेस्ट सामना दुसऱ्याच दिवशी संपुष्टात आला. या दोन्ही सामन्यांनंतर पीचवरून पुन्हा वाद निर्माण होताना दिसला. अशात दुसरा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने पीचच्या मुद्द्यावरून आयसीसीवर निशाणा साधला आहे.
दुसरा टेस्ट सामना जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला, वर्ल्डकप फायनलच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिल्याबद्दल आयसीसीवर निशाणा साधलाय. केपटाऊनच्या खेळपट्टीबाबत त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित पुढे म्हणाला की, या सामन्यात काय झालं ते सर्वांनी पाहिलंय. जोपर्यंत तुम्ही भारतीय पीचबद्दल तक्रार करणं थांबवत नाही, तोपर्यंत मला या खेळपट्टीवर खेळण्यास कोणतीही अडचण नाहीये. त्यामुळे तोंड बंद ठेवा. इथे खेळण्यात धोका होता, एक आव्हान होतं, तुम्ही भारतातील आव्हानही पेलता. भारतात पहिल्या दिवसापासून ट्रॅक टर्न केल्यानंतर धूळ उडते, असं म्हणतात. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात शतक ठोकले आणि त्या खेळपट्टीला खराब म्हणलं गेलं. तुम्ही खेळपट्टी पाहून रेटिंग द्या, देश पाहून नाही.
या दोन टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी इंग्लंडचा माजी ओपनर ख्रिस ब्रॉड आयसीसीचा मॅच रेफरी होते. रोहितच्या म्हणण्यानुसार, जागतिक मंडळाच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेला रेफरी 'तटस्थ' असावा. काही रेफरी खेळपट्ट्यांचं मूल्यांकन कसं करतात यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.'
रोहित म्हणाला की, मला अजूनही विश्वास बसत नाही की वर्ल्डकपच्या फायनल सामन्याच्या पीचला सरासरीपेक्षा कमी रेटिंग देण्यात आली होती. ती खराब खेळपट्टी कशी असू शकते? रेफरी पीच कसं पाहतात यावरून ते मूल्यमापन करतात, देशांवर आधारित नाही.
केपटाऊनमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. दुसरा टेस्ट सामना अवघ्या दीड दिवसांत संपला. या सामन्यात केवळ 107 ओव्हर्स फेकण्यात आले. संपूर्ण टेस्ट सामन्यात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आलं. मुख्य म्हणजे पहिल्याच दिवशी 23 विकेट पडल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिवशीही 10 विकेट पडल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्स राखून पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंदवला.