मुंबई : नागपूर विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यासह भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ने धूळ चारत मालिका जिंकली. या मालिकेत भारताचा सध्याचा टॉप गोलंदाज केदार जाधवने पहिल्यांदाच १० ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला. त्याच्या गोलंदाजीदरम्यनचा मजेदार व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.
केदार जाधवने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच १० ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला. जाधवने मालिकेच्या शेवटच्या सामन्यात १० ओव्हरमध्ये एक गडी बाद केवळ ४८ चाळीस धावा दिल्या. जाधवने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथला बाद करून मोठी मजल मारली. त्याची १०वी ओव्हर ऑस्ट्रेलियाला चांगलीच महागात पडली. १०व्या ओव्हरमध्ये त्याने केवळ १३ धावा दिल्या.
केदारच्या गोलंदाजीदरम्यानचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसते की, केदारची चेंडूफेक अगदी लसिथ मलिंगासारखी आहे. त्याचा चेंडू कधी फिरकी घेईल आणि गोलंदाजाच्या विकेटचा किंवा पायाचा वेध घेईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्याची चेंडूफेक पाहिली तर क्रिकेटच्या भाषेत त्याला ऑफ स्पिनर टाईप गोलंदाज म्हणता येऊ शकेल. नागपूर वनडेत हेच दिसले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार केदारचा चेंडू स्वीप करण्याच्या नादात पायचीत (एलबीडब्लू) होऊन बाद झाला.