पंजाब : डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये आजपर्यंत मुलांचे अधिराज्य होते.
जगभरातील खेळाडू यामध्ये सहभाग घेतात. पण पहिल्यांदा कविता देवी या भारतीय महिलेने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये प्रवेश केला आहे.
Sending a huge congratulations to @KavitaDeviWWE and also @WWE for making history today. Kavita is the first Indian woman to sign with WWE.
— The Maharaja (@JinderMahal) October 15, 2017
डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन जिंदर महाल यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून कविताचे कौतुक केले आहे.
कविता मूळची हरियाणाची आहे. 'खली' म्हणजेच दिलीप सिंग राणाकडे कविताने तालीम घेतली. पंजाबमधील कुस्ती ट्रेनिंग सेंटरमध्ये कविताने मेहनत घेतली आहे. साऊथ एशियन गेम्समध्ये २०१६ साली कविताने गोल्डन कामगिरी केली आहे. डब्ल्यूडब्ल्यूईच्या स्पर्धेसाठी कविता लवकरच फ्लोरिडामध्ये जानेवारी महिन्यापासून प्रशिक्षण घेण्यास सुरूवात करणार आहे.
डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणारी मी पहिलीच महिला आहे. हे अभिमानास्पद असल्याचे कविताने सांगितले आहे. Mae Young Classic या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर खूप शिकायला मिळेल अशी आशादेखील कविताने बोलून दाखवली आहे.
'कविता तरूणांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे तसेच तिला आयुष्यात यश मिळावे याकरिता सदिच्छा देतो' अशा भावना जिंदर महालने व्यक्त केल्या आहेत.