PICS : सचिन आणि अर्जुनने घेतली WWE चॅम्पियनची भेट

डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन जिंदर महल सध्या भारतात आलेला आहे. WWE डिसेंबरमध्ये एक लाईव्ह इव्हेंट करणार आहे. हा लाईव्ह इव्हेंट ८ आणि ९ डिसेंबरला न्यू दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार आहे.

Updated: Oct 16, 2017, 06:12 PM IST
PICS : सचिन आणि अर्जुनने घेतली WWE चॅम्पियनची भेट title=

मुंबई : डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन जिंदर महल सध्या भारतात आलेला आहे. WWE डिसेंबरमध्ये एक लाईव्ह इव्हेंट करणार आहे. हा लाईव्ह इव्हेंट ८ आणि ९ डिसेंबरला न्यू दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार आहे.

त्यासाठी जिंदर महल भारतात आलेला आहे. WWE या इव्हेंटला यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. या इव्हेंटसोबत मोठमोठी नावं ते जोडत आहेत. रोमन रेन्स, सेथ रोलिंस, डिन अम्ब्रोस, ब्रोन स्ट्रोमॅन, शाशा बॅंक, मिज, मिज्तोरेज, जिंदर महल, सिंह ब्रदर्स, अलिक्सा ब्लिस या पहेलवानांमध्ये इव्हेंटमध्ये टक्कर होणार आहे. 

भारत दौ-यावर आलेला जिंदर महल ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर याच्या घरीही गेला. जिंदरने इथे सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला ‘मॉर्डन डे महाराजा’ टी-शर्ट गिफ्ट केली. त्यासोबतच त्यांना लाईव्ह इव्हेंटमध्ये येण्याचं निमंत्रणही दिलं. 

दरम्यान, दोन महिन्यांआधी WWE ने घोषणा केली होती की, रॉ चे सुपरस्टार्स डिसेंबरमदध्ये दोन लाईव्ह इव्हेंटसाठी भारतात येतील. ट्रिपल एचने सुद्धा आपल्या भारत दौ-यावर सांगितले होते की, जिंदर महल आणि सिंह ब्रदर्स हे मुळचे भारतीय सुपरस्टार्स आहेत. ते या लाईव्ह इव्हेंटचा भाग होतील.