Gold Rate Today: दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाल्यानंतर आज मात्र सोनं स्वस्त झालं आहे. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या आठवड्यातच सोनं-चांदीच्या दरात घसरण होत आहे. मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी कमोडिटी बाजारात सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. वायदे बाजाराही सोनं घसरलं आहे. आज चांदीच्या दरात 124 रुपयांची घसरण झाली असून 94,160 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. सोमवारी चांदी 94,284वर स्थिरावली होती.
दिवाळीत सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र या आठवड्यात सोनं उतरणीला लागलं आहे. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळं सोन्याची मागणी वाढते. वर-वधुंसाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी जोरात वाढते. आता सोन्याचे भाव उतरणीला लागल्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाली असून आज सोनं प्रतितोळा 80,240 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 73,550 रुपयांवर स्थिरावले आहे. आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 120 रुपयांनी घसरुन 60,180 रुपयांवर स्थिरावली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 73,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 80,240 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 60,180 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,355 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8, 024 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6, 018 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,840 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 64,192रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 48,144 रुपये
22 कॅरेट- 73,550 रुपये
24 कॅरेट- 80,240 रुपये
18 कॅरेट- 60,180 रुपये