मुंबई : कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान सुपर लीग जी मार्चमध्ये स्थगित करण्यात आली होती, ती आता पुन्हा सुरु झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे ज्यामुळे पीएसएल पुन्हा सुरू झाली आहे. मात्र प्लेऑफ सुरू होण्यापूर्वीच कराची किंग्ज चांगलीच ट्रोल झाली होती.
कराची किंग्जने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. प्लेऑफच्या सुरूवातीस, संघाने त्यांचा नवीन खेळाडू शेराफॅन रदरफोर्डचा फोटो शेअर केला आणि ट्रोल झाले.
Arrival of our #King #SherfaneRutherford for the Playoffs of #HBLPSLV
Karachi Kings Phir Se Tayyar Hai‼️#HBLPSLV #KarachiKings #YehHaiKarachi #PhirSeTayyarHain pic.twitter.com/qGMNBAf7dG— Karachi Kings (@KarachiKingsARY) November 11, 2020
वास्तविक, या कॅरिबियन खेळाडूला कराची किंग्जमधील ख्रिस जॉर्डनच्या जागी घेण्यात आले आहे. ख्रिस जॉर्डन आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यात व्यस्त आहे, ज्यामुळे तो बाकी पीएसएल सामने खेळत नाहीये. त्याऐवजी संघात शेराफेन रदरफोर्ड आला आहे. जो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचाच एक भाग होता.
आयपीएल संपल्यानंतर रदरफोर्ड थेट युएईहून पाकिस्तानला पोहोचला. त्यानंतर टीमने त्याचा फोटो पोस्ट केला जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत रुदरफोर्डने मुंबई इंडियन्सची जर्सी घातली आहे. यामुळे सोशल मीडियावर कराची टीमला ट्रोल केले जात आहे.