मुंबई : सनरायझर्स हैदराबाद टीमचा कर्णधार केन विलियम्सन आहे. यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच टीम मॅनेजमेंटने कर्णधारपदाची धुरा केनकडे सोपवली. शिवाय गेल्या सिझनमध्येही दुसऱ्या टप्प्यात कर्णधार बदलून केनकडे कॅप्टन्सी देण्यात आली होती. आपल्या सर्वांनाच माहितीये की हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन आहे. मात्र याची माहिती अजूनही गुगलपर्यंत पोहोचलेली दिसत नाही.
गुगुलवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णाधर असं सर्च केल्यावर अजूनही डेव्हिड वॉर्नरचं नाव समोर येतंय. मात्र अधिकृतपणे केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे.
तुम्हीही गुगलवर sunrisers hyderabad captain असं सर्च केल्यास डेव्हिड वॉर्नर आणि त्याचे हैदराबादच्या जर्सीमधील फोटो समोर येतात. सध्या डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचा भाग आहे.
ल्या सिझनच्या सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली टीमला साजेशी कामगिरी करता आली नाही. अशातच कोरोनामुळे आयपीएल स्थगित केली. यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात वॉर्नरला वगळून केन विलियम्सनकडे टीमची कमान सोपवण्यात आली. यानंतर हैदराबाद टीम मॅनेजमेंट आणि वॉर्नर यांच्यात वाद झाल्याचीही चर्चा होती.
दरम्यान सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला यंदाच्या सिझनसाठी रिटेनंही केलं नव्हतं. शिवाय मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर बोलीही लावण्यात आली नाही.