गब्बर आणि अग्रवाल पुन्हा जडेजाच्या टीमचा धोबीपछाड करणार?

रविंद्र जडेजाचा डाव आज तरी यशस्वी होणार? काय सांगतात हेड टू हेड अंदाज

Updated: Apr 3, 2022, 10:12 AM IST
गब्बर आणि अग्रवाल पुन्हा जडेजाच्या टीमचा धोबीपछाड करणार? title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात चेन्नईसाठी विशेष चांगली राहिली नाही. सलग दोनवेळा पराभवाचा सामना कर्णधार रविंद्र जडेजाला करावा लागला. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता झाला. यामध्ये कोलकाता टीमने चेन्नईवर विजय मिळवला. 

दुसरा सामना चेन्नई विरुद्ध लखनऊ झाला. लखनऊने 6 विकेट्सने चेन्नईला पराभूत केलं. आयपीएल सुरू होण्याआधी महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वामध्ये दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागला.

आज चेन्नईचा पंधराव्या हंगामातील तिसरा सामना पंजाब विरुद्ध होणार आहे. मयंक अग्रवाल आणि गब्बर दोघं मिळून आज पुन्हा चेन्नई टीमचा छोबीपछाड करणार का? रविंद्र जडेजा आपला पहिला विजय मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यात कोणाचं पारडं जड आहे ते एकदा हेड टू हेड अंदाज काय सांगतात जाणून घेऊया.

पंजाब विरुद्ध चेन्नई आतापर्यंत 25 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. चेन्नई टीमने 15 सामने जिंकले आहेत. पंजाबला 10 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आलं. 2021 चा अंदाज पाहिला तर दोन्ही संघ एक एक सामने जिंकले आहेत. तर 2020 मध्ये चेन्नईला सामने जिंकण्यात यश आलं.

यंदाच्या आयपीएलमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. सर्वात उत्तम टीम म्हणून चेन्नई, मुंबईकडे पाहिलं जात असताना या दोन्ही टीमला विजय अजूनही मिळवण्यात यश आलं नाही. पॉईंट टेबलवर आपलं खातं उघडण्यात अपयशी ठरले आहेत. 

लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मोईन अलीच्या खराब फिल्डिंगचा फटका चेन्नईला बसला. पंजाब विरुद्धच्या सामन्यात तो गेमचेंजर ठरणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत.